ड्रेनेज, अंतर्गत रस्त्यांचे लागले वाटोळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

सांगली - चिंतामणीनगर, राजीवनगर या शहरालगतच्या भागातील अपवाद वगळता बहुतांश भागात ड्रेनेज, गटारीच्या समस्या सर्वांत मोठी आहे. निचाराही व्यवस्थित नसल्याने लोकांना बारमाही डासांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर रिकामे प्लॉट आणि खुल्या जागांत ठिकठिकाणी पाणी साचल्याने तळ्यांचे चित्र पहावयास मिळते. प्रमुख रस्ते डांबरी झाले मात्र अंतर्गत रस्त्यांवर पुरेसा मुरूमही टाकण्यात आलेला नाही. 

सांगली - चिंतामणीनगर, राजीवनगर या शहरालगतच्या भागातील अपवाद वगळता बहुतांश भागात ड्रेनेज, गटारीच्या समस्या सर्वांत मोठी आहे. निचाराही व्यवस्थित नसल्याने लोकांना बारमाही डासांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर रिकामे प्लॉट आणि खुल्या जागांत ठिकठिकाणी पाणी साचल्याने तळ्यांचे चित्र पहावयास मिळते. प्रमुख रस्ते डांबरी झाले मात्र अंतर्गत रस्त्यांवर पुरेसा मुरूमही टाकण्यात आलेला नाही. 

चिंतामणीनगरच्या टोलेजंग बंगल्या परिसरात ड्रेनेजसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सांगली आरटीओ कार्यालयाच्या दक्षिणेकडील चिंतामणीनगर झोपडपट्टीत समस्यांशी नागरिकांना समोरे जावे लागते. झोपडपट्टीत रस्ते अपुरे आहेत. असलेल्या रस्त्यांच्या दुर्तफा गटारी पक्‍क्‍या सिमेंट कॉंक्रिटने बांधणे आवश्‍यक आहे. प्रत्यक्षात येथे अर्धगोलाकार पाईपच्या बसवून गटारी बांधायला येथील नागरिकांनी विरोध केला होता. काही गटारीचे काम बंद पाडले होते. पुन्हा महापालिकेने मागण्यांकडे दुर्लक्ष करीत काम पूर्ण केल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. खुशींमुळे येथे गटारीना रहात नाहीत अर्धगोलाकार पाईपा लगेच खराब होण्याची शक्‍यता आहे. 

चिंतामणीनगरात जगदाळे प्लॉट ही सर्वांत पहिली वसाहत आहे. मात्र येथे कोणत्याही भागात गटारीच नाहीत. पावसाळ्यात घरात पाणी शिरते. येथील नगरसेवक इकडे फिकरायलाही तयार नाहीत. गरीब, मजूर आणि हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कष्टकरी लोकांचे चिंतामणी नगरच्या झोपडपट्टीत राहतात. चिंतामणीनगरचा बंगल्यांची वसाहत वगळता अपवाद सोडला तर इतरत्र समस्यांचे आगरच दिसून येते. 

राजनगरच्या भागात काही भाग वगळता ड्रेनेज नाहीत. अंतर्गत रस्त्यांबाबत लोकांची मोठी ओरड आहे. कचरा उठावची सर्वत्रच तक्रारी आहेत. अनेक भागातील खड्डे, गटारींचा अभावामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहतानाचे चित्र आहे. अनेक विस्तारित भागात गलिच्छपणा कायमच आहे. घंटागाडीचा कधीतरी आठवड्यातून येथे फिरकते. परिणाम रस्त्यावरच घाणीचा उपद्रव सर्वांना सोसावा लागतो. थोड्याशा पावसाने गटारी ओसंडून वाहतात. अनेक भागात घरात पाणी शिरते. 

आयटीआयच्या दक्षिणेकडील भागात जगदाळे 
वसाहतीत आम्ही अनेक वर्षांपासून राहतो. येथे गटारीच नाहीत. पावसाळ्यात गटारींचे पाणी घरात शिरते. महापालिकेकडे स्वच्छतेसाठी केलेल्या तक्रारीकडेही लक्ष दिले जात नाही. यानंतर झालेल्या अनेक भागात महापालिकेने सुविधा पुरवल्या आहेत. 
सौ. लक्ष्मी साळुंखे, जगदाळे प्लॉट. 

आमच्या भागात खुल्या जागांमधील पाण्याचा निचराच केलेला नाही. परिणामी बारमाही येथील लोकांना डास फोडतात. महापालिका रस्तेही करीत नाही. मुरूमही लोक आपापल्या गरजेप्रमाणे आणून टाकतात. सांगलीत आहे की एखाद्या खेडेगावत अशी या परिसराची अवस्था आहे. 
-धनंजय हजारे, चिंतामणी हौसिंग सोसायटी.