अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

सांगली - जिल्ह्यासह शहरातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांच्या आवारात अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची एकच झुंबड उडाली आहे. यंदा सर्वच प्रवेश ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असून उद्या (ता. 30) प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला प्रथम प्राधान्य दिले असून त्या पाठोपाठ वाणिज्य आणि कला शाखांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातून यंदा दहावीतून 39 हजार 653 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कुवतीनुसार आणि प्राप्त गुणांनुसार आपल्या आवडत्या महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. उद्या अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर 

प्रवेश अर्जांची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी 1 ते 4 जुलै या कालावधीत तयार होणार आहे. त्यानंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी 5 जुलै रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय अकरावीचे वर्ग असलेल्या उच्च माध्यमिक शाळांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध होईल. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 6 ते 10 जुलै हा कालावधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच शाखांचे अकरावीचे वर्ग 11 जुलैपासून नियमित सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण 232 कनिष्ठ महाविद्यालयांमधून अकरावीचे वर्ग असून 180 अनुदानित तुकड्या आहेत. याचसोबत दहावीनंतर सरकारी आयटीआय-10, खासगी आयटीआय -15 मधून आयटीआयच्या तीन हजार 700 जागा आणि 22 अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून पदविकांसाठी साडेसहा हजार जागा उपलब्ध आहेत.