सांगली जिल्ह्यात वीज थकबाकी ३० कोटींनी वाढली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सांगली - वीज बिलांची वाढती थकबाकी महावितरणला मारक आहे. गेल्या दोन महिन्यात ३० कोटींनी  थकबाकी वाढली आहे. ती वसूल करणे गरजेचे आहे. त्यामुळे शून्य थकबाकीच्या ध्येयानेच काम करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी नुकताच दिला. वसुली न झाल्यास विद्युत पुरवठा खंडित करावा, असेही ते म्हणाले.

सांगली मंडल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी मुख्य अभियंता किशोर परदेशी, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे, सांगलीचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. एस. काटकर उपस्थिती होती.

श्री. ताकसांडे यांनी चालू, थकीत वीज बिलांच्या  वसुलीचा आढावा घेतला. गेल्या दोन महिन्यांत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकीत मोठी वाढ झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘थकबाकी चिंताजनक आहे. यापुढे  कामातील हयगय खपवून घेणार नाही. संबंधितांवर नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल तसेच त्यांची नोंद गोपनीय अहवालात करू.’’

ते म्हणाले, ‘‘अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी, कर्तव्यांना न्याय दिला पाहिजे. वीजपुरवठ्यासाठी प्रत्येक युनिटचा हिशेब द्यावा लागतो. वीजग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुलीही करावी लागते, याची जाणीव ठेवा. थकबाकी वसूल महावितरणची आर्थिक गरज आहे. त्यामुळे थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करावी.’’

टॅग्स