मिरज, ढवळी, म्हैसाळच्या शेतकऱ्यांकडून वीज बिलाची होळी

संतोष भिसे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मिरज - म्हैसाळ, ढवळी व मिरज परिसरातील शेतकऱ्यांनी आज शेतीसाठीच्या वीज बिलाची होळी केली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  महादेवराव कोरे यांच्या अध्यक्षतेखाली शेती वीज बिलांबाबत बैठक घेतली. यामध्ये वीज बिलांची होळी करण्यात आली. 

कोरे म्हणाले, दुष्काळ, अतिपाऊस या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात असताना अन्यायी वसुली सुरु आहे.  भाजप सरकारच्या नोटबंदी, शेतमालाला निर्यात बंदी, उसास राज्यबंदी यासारख्या निर्णयांमुळे शेतकरी संकटात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 2012 मधील अध्यादेशानुसार शासन शेतीपंपाचे 16 तासांचे वीजबिलाचे पैसे महावितरणला देते,  पण महावितरणकडून शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज मिळते. त्यामुळे महावितरणनेच उरलेल्या आठ तासांची भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे.

- महादेवराव कोरे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

शेतकऱ्यांवर नैसर्गिक व सरकारी संकट असताना वीज कनेक्शन तोडु नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोरे  यांनी दिला.  

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिक माळी, बसगौडा कोरे, कमलेश्वर कांबळे, मारुती माळी, प्रदीप कोरे नरसु गौराजे उपस्थित होते.
 
Web Title: Sangli News farmers agitation against hike in light bill