मराठा क्रांती मोर्चाकडून मागण्यांचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

सांगली - मुंबईत नऊ ऑगस्टला काढण्यात आलेल्या मोर्चाला सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचा पाठपुराव सुरूच राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व संघटनांना बरोबर घेऊन तो करूया असा निर्धार आज येथे करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचा आढावा घेण्यासाठी येथे बैठक झाली. तीत मोर्चा, जिल्ह्यातील सहभाग आणि पुढील वाटचाल यावर चर्चा झाली. 

श्रीरंग पाटील, नितीन चव्हाण, डॉ. संजय पाटील, धनाजी कदम, प्रवीण पाटील, पंडित पाटील, अशोक पाटील, मनीषा माने, नानासाहेब पाटील, विजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मुंबईतील मोर्चाला मिळालेला प्रतिसाद, सरकारकडून मिळालेली आश्‍वासने या पार्श्‍वभूमीवर आजची बैठक झाली. मुंबई मोर्चाच्या नियोजनात सहभागी झालेले काही कार्यकर्त्यांनी मोर्चादिवशी घडलेल्या घटना, घाडामोडींचा आढावा घेतला. मोर्चाला केवळ आश्‍वासने दिली गेली अशी चर्चा असल्याच्या मताचे खंडण करताना कार्यकर्त्यांनी सांगितले, की आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने तोपर्यंत सरकारने ओबीसींप्रमाणे सवलती देण्याचे जाहीर केले आहे. ही मोर्चाची उपलब्धी असल्याचे मत काहींनी मांडले. त्याचबरोबर सरकारने देऊन केलेल्या सवलती जीआरमध्ये लवकर परिवर्ती व्हाव्यात. त्यासाठी पाठपुरावा करावा, तसेच त्याबाबत राज्य समन्वय समितीशी संपर्कात रहावे, असे ठरले.

मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक असे वसतीगृह देण्याचे व त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे सरकारने जाहिर केले आहे. त्याचा पाठपुरावा करावा, असे ठरले. 

डॉ. संजय पाटील यांनी मुंबई मोर्चाला जाताना समाजबांधवांकडून झालेली वस्तू व रोख स्वरूपातील मदतीचा हिशेब मांडला. त्यांनी देणगीदारांप्रती आभार व्यक्त केले.