‘झायबेन’ बुरशीनाशकाला विक्री बंदचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

सांगली - अप्रमाणित आढळलेल्या ४३ हजार रुपयांच्या ‘झायबेन’ बुरशीनाशकाला विक्री बंदचे आदेश दिल्याची माहिती कृषीचे मोहीम अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली. जम्मू काश्‍मीरमध्ये हे बुरशीनाशक सफरचंदवरील बुरशीसाठी वापरले जाते. दरम्यान, भाताच्या एका बियाण्याच्या उगवण क्षमतेत फरक आढळल्याने संबंधित कंपनीस ताकीद देण्यात आली. 

सांगली - अप्रमाणित आढळलेल्या ४३ हजार रुपयांच्या ‘झायबेन’ बुरशीनाशकाला विक्री बंदचे आदेश दिल्याची माहिती कृषीचे मोहीम अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली. जम्मू काश्‍मीरमध्ये हे बुरशीनाशक सफरचंदवरील बुरशीसाठी वापरले जाते. दरम्यान, भाताच्या एका बियाण्याच्या उगवण क्षमतेत फरक आढळल्याने संबंधित कंपनीस ताकीद देण्यात आली. 

तासगाव तालुक्‍यात काही दिवसांपूर्वी फील या जम्मू-काश्‍मीरमधील कंपनीच्या झायबेन या बुरशीनाशकाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या बुरशीनाशकाची तपासणी केली. त्यामधील घटकांचे प्रमाण कमी अधिक आढळले. अप्रमाणित असल्याने संबंधित बुरशीनाशक खरेदी करून शेतकऱ्यांनी वापरले त्याचा चुकीचा परिणाम होणार हे स्पष्ट होते. त्यामुळेच हे बुरशीनाशक शेतकऱ्यांनी घेऊ नये या करिता ते बुरशीनाशक विक्रीस न ठेवणे आवश्‍यक होते. या बुरशीनाशकाचा नमुना अप्रमाणित आल्यानंतर त्यावर विक्री बंदचे आदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेचे  अधिकारी संबंधित दुकानात गेले असता तेथील साठा संपल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी इतरही दुकानांची तपासणी केली. त्यात तासगावमधील खैरनार एजन्सीमध्ये झायबेन बुरशीनाशकाचा साठा आढळला. त्या ठिकाणी अर्धा  लिटर बुरशीनाशकाचे १५८ नग असून त्याची किंमत ४३  हजार ४५० इतकी होते. त्या सर्व बुरशीनाशकाची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले. शिराळा तालुक्‍यात घेण्यात आलेल्या भात पिकांच्या नमुन्यातही एका बियाण्याच्या उगवण क्षमतेत तफावत आढळली. 

घटकांचे प्रमाण कमी अधिक
तासगाव तालुक्‍यात काही दिवसांपूर्वी फील या जम्मू-काश्‍मीरमधील कंपनीच्या झायबेन या बुरशीनाशकाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या बुरशीनाशकाची तपासणी केली. त्यामधील घटकांचे प्रमाण कमी अधिक आढळले.

टॅग्स

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ रद्द करा नाहीतर...

04.21 AM

सातारा - समन्वयाचा अभाव असलेली सातारा विकास आघाडी, सातत्य राखण्यात कमी पडलेली नगर विकास आघाडी, प्रत्येकाचा सवतासुभा असलेली...

03.30 AM

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून कर वसुलीसाठी कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. 19)...

03.21 AM