गौरीचा मृतदेह अठरा तासांनी सापडला

संतोष भिसे
रविवार, 22 एप्रिल 2018

मिरज - आरग येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या गौरी शंकर चव्हाण ( वय 10 वर्षे ) या बालिकेचा मृतदेह आज सकाळी लांडगेवाडी येथील पंपगृहात सापडला. काल रात्रभर पंपगृहातील पाण्याचा अखंड उपसा करण्यात आला. पाणीपातळी खालावल्यानंतर गौरीचा मृतदेह दृष्टीस पडला. आज दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरग मुख्य कालव्यात पाचव्या किलोमीटरमध्ये मैत्रिणींसमवेत गौरी गेली असता पाय घसरुन पाण्यात पडली होती. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ती वाहत गेली. दुपारी एक वाजल्यापासूनच शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. कालव्यात आणि लांडगेवाडी पंपगृहात पाणीसाठा भरपूर असल्याने शोध लागत नव्हता. पाणी कमी व्हावे यासाठी संपुर्ण म्हैसाळ योजना बंद ठेवण्यात आली.

चौथ्या टप्प्यात लांडगेवाडी पंपगृहाजवळील संतुलन तलावात काल रात्री दिड वाजेपर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र अंधार आणि मोठा पाणीसाठा यामुळे ग्रामस्थांनी मोहीम थांबवली. काल रात्रभर पंपगृहातून पाणीउपसा करुन सलगरे कालव्यात सोडण्यात आले. सकाळी पाणीसाठा खुपच कमी झाला. सातच्या सुमारास तलावात पुन्हा शोध सुरु असता गौरीचा मृतदेह सापडला. एका दगडाला फ्रॉक अडकल्याने मृतदेह तंरगत राहीला होता. 

दुपारी मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले; त्यानंतर मळ्यातच दफनविधी झाला. यावेळी तिच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. मोठ्या संख्येने ग्रामस्थ गोळा झाले होते. मृतदेह सापडल्याननंतर काही मिनिटांतच म्हैसाळ योजनेचे सर्व पंप पुन्हा सुरु करण्यात आले.

Web Title: Sangli News Gouri Dead in Mahishal Canal