सांगली जिल्ह्यात २८ ग्रामपंचायती बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सांगली - जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतींनी एकविचाराने आदर्श निर्माण करत निवडणुका बिनविरोध केल्या. त्यात शिराळा तालुक्‍यातील सर्वाधिक १० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आता १६ रोजी ४२५ इतक्‍या ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. 

सांगली - जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतींनी एकविचाराने आदर्श निर्माण करत निवडणुका बिनविरोध केल्या. त्यात शिराळा तालुक्‍यातील सर्वाधिक १० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आता १६ रोजी ४२५ इतक्‍या ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. 

आज (ता. ६) पासून प्रचाराच्या तोफा धडाडणार असून, गाव कारभारी होण्यासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार होणार आहे. ऑक्‍टोबर हिट जाणवू लागलेली आहेच, त्यात आता प्रचाराचे रणही तापणार आहे. जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रिंगण जाहीर झाल्यानंतर गावोगावी गावकारभारी होण्यासाठी इच्छुकांनी उडी घेतली. निवडणुकीतील ३ हजार ९५५ जागांसाठी ८७४३ जणांनी ८८३९ अर्ज दाखल केले होते. सरपंचपदासाठी १५०४ उमेदवारांनी १५१८ अर्ज दाखल केले. त्यातून कितीजण माघार घेणार, निवडणुका दुरंगी होणार की तिरंगी, याकडे गावाचे लक्ष लागले होते. आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले. 

तालुकावार बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती
वाळवा ः मरळनाथपूर, जुनेखेड, फार्णेवाडी (बोरगाव), भरतवाडी, कोळे 
आटपाडी ः यमाजी पाटलाची वाडी, बाळेवाडी, कामथ, पारेकरवाडी, पडळकरवाडी

शिराळा ः कोकरुड, माळेवाडी, चिखली, शिंदेवाडी, गिरजवडे,  चिंचोली, शेडगेवाडी, गवळेवाडी, खुंदलापूर, वाकुर्डे खुर्द.

कवठेमहांकाळ ः केरेवाडी, लांडगेवाडी
तासगाव ः भैरववाडी  

पलूस ः  पुणदीवाडी
कडेगाव ः रेणुशेवाडी  

मिरज ः  रसूलवाडी
 जत ः रावळगुडवाडी, कसिलिंगवाडी

Web Title: sangli news Grampanchayat Election