द्राक्षाच्या कृष्णा चमनला 451, तर सोनाकाला 291 रुपये दर

सांगली : जिल्हयातील द्राक्षहंगाम सुरू झाला. तासगाव येथील सुदाम माळी यांच्या कृष्णा चमनला 451 रुपये दर मिळाला. 
सांगली : जिल्हयातील द्राक्षहंगाम सुरू झाला. तासगाव येथील सुदाम माळी यांच्या कृष्णा चमनला 451 रुपये दर मिळाला. 

तासगाव - तब्बल पाच वेळा हवामानातील बदलाचा फटका, डाउनीचा प्रचंड फटका बसूनही तासगाव तालुक्‍यातील द्राक्ष हंगाम सुरू झाला असून द्राक्ष काढणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात कृष्णा चमन ला 451 तर सोनाका ला 291 रुपये चार किलो असा दर मिळाला आहे. तासगाव, मणेराजुरी, सावळज आळते, येथील द्राक्षे बाजारपेठेत रवाना होऊ लागली आहेत. डाउनीचा प्रचंड फटका बसलयाचेही आता स्पष्ट होऊ लागले आहे. 

यावर्षी अभूतपूर्व अशा अस्मानी संकटाला द्राक्षबागायतदारांना तोंड द्यावे लागत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीच्या द्राक्षहंगामाबाबत साशंकता होती. लवकर छाटणी केलेल्या बागांवर डाउनीचा मोठा हल्ला झाला होता, त्यामध्ये अनेक बागा अक्षरशः सोडून द्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे हंगाम उशिरा सुरू होईल असे वाटत असताना नेहमीप्रमाणे हंगामाची सुरवात आशादायक झाली आहे. तासगाव येथील सुदाम माळी यांच्या सोनाका जातीच्या हिरव्या द्राक्षांना 291 रुपये प्रती चार किलो असा दर मिळाला आहे, तर त्यांच्याच कृष्णा चमन जातीच्या काळ्या द्राक्षांना 451 रुपये प्रती चार किलो असा दर मिळाला आहे. तमीळनाडूच्या द्राक्ष व्यापाऱ्याने ही द्राक्षे खरेदी केली.

सध्या तासगाव, मणेराजुरी, आळते, सावळज, बेळंकी, सलगरे आणि मिरजपूर्व भागातील काही गावांमधील द्राक्षे काढणीसाठी तयार झाली असून, दक्षिण भारतातील द्राक्ष व्यापारी द्राक्षांच्या शोधात फिरू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये द्राक्षांना चांगले दर मिळत असल्याने काही द्राक्ष उत्पादक शेतकरी धाडस करून लवकर छाटण्या घेतात, परिणामी डिसेंबर मध्ये ख्रिसमससाठी ही द्राक्षे उपलब्ध होतात.

मात्र, त्यासाठी खूप मोठी रिस्क द्राक्षबागातयदारांना घ्यावी लागते. डिसेंबर, जानेवारीमध्ये बदलते हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्‍यता असते. यापार्श्‍वभूमीवर यासाऱ्या संकटावर मात करत यावर्षी द्राक्षे बाजारात आली असून, तमीळनाडू, कर्नाटक या राज्यांत द्राक्षे रवाना होऊ लागली आहेत. 

उत्पादनात यंदा निम्म्याने घट 
सलग एकापाठोपाठ आलेल्या अस्मानी संकटामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाल्याचे आता स्पष्ट होऊ लागले असून, अनेक बागायतदारांना गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जादा द्राक्ष पिकामध्ये घट झाल्याचे दिसत आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या सुरू झालेली द्राक्षे कमी गोडीची असली तरी आकर्षक रंगामुळे बाजारात मागणी असल्याचे मत द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्‍त करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com