तासगावात हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो 175 रूपये दर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

तासगाव - तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौदे सुरू झाले. आज पहिल्याच सौद्यात 165 टन आवक होवून हिरव्या बेदाण्याला प्रतिकिलो 175 रूपये इतका विक्रमी दर मिळाला.

तासगाव - तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौदे सुरू झाले. आज पहिल्याच सौद्यात 165 टन आवक होवून हिरव्या बेदाण्याला प्रतिकिलो 175 रूपये इतका विक्रमी दर मिळाला. दरम्यान, झिरो पेमेंट न केल्यामुळे 21 खरेदीदारांना सौद्यात भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात आला. 

आज दिवाळीनंतरचा पहिला बेदाणा सौदा निघाला. सौद्यात दहा दुकानांत 11023 बॉक्‍स बेदाण्याची आवक झाली. 9170 (138 टन) बेदाण्याची विक्री झाली. सतिश ट्रेडिंग कंपनीमध्ये डी. आर. बाहेकटटी (विजापूर) यांच्या हिरव्या बेदाण्याला सौद्यात 175 रूपये प्रतिकिलो असा दर मिळाला. अष्टविनायक ट्रेडर्स यांनी बेदाणा खरेदी केला. आजच्या सौद्यात बेदाणा दरात 15 ते 20 रूपयांची वाढ झाल्याचे चित्र दिसले. 

आजचे दर (प्रतिकिलो) असे

हिरवा बेदाणा 100 ते 175,

पिवळा बेदाणा 95 ते 150

काळा बेदाणा 35 ते 70 रूपये 

दरम्यान, बाजार समितीने अडत दुकानांची तपासणी करून झिरो पेमेंट न केलेल्या 21 खरेदीदार व्यापाऱ्यांना बेदाणा सौद्यात खरेदीस प्रतिबंध केला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे येणे-देणे क्‍लीअर केल्यानंतर त्यांना व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येईल, असे सभापती रवींद्र पाटील यांनी स्पष्ट केले. 

खरेदीदार व्यापाऱ्यांनी अडत्यांची देणी तातडीने पूर्ण करावीत, अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बेदाण्याचे पैसे 21 ते 23 दिवसात द्यावेत, खरेदीदार व्यापाऱ्यांनी अडत व्यापाऱ्यांची देणी 35 ते 40 दिवसात पूर्ण करावीत याची बाजार समिती तपासणी करणार आहे. बाजार समितीस खोटी माहिती दिल्यास अडत दुकानांचे सौदे महिन्यासाठी बंद करण्यात येणार आहेत. बाजार समिती खरेदीदार व व्यापाऱ्यांच्या येण्यादेण्यासाठी क्‍लीअरींग हाऊस सुरू करणार आहे. 

- रविंद्र पाटील, 
सभापती, तासगाव बाजार समिती 
 

Web Title: Sangli News Green raisin rate 175 per KG