जयंतराव, थेट माझ्यावर टीका करा; इस्लामपूर नगराध्यक्षांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

इस्लामपूर: आमदार जयंत पाटील यांनी लिंबू-टिंबूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून टीका करण्यापेक्षा जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षावर थेट टीका करावी, असे आव्हान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिले. दुधात मिठाचा खडा टाकण्याची त्यांना सवय आहे. त्यांच्या कूटनीतीला विकास आघाडी जशास तसे प्रत्युत्तर देईल, असे म्हणत उपनगराध्यक्ष दादा पाटील आणि "राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी आपली मर्यादा ओळखून मगच टीका करावी, असेही ते म्हणाले.

"राष्ट्रवादी'ने मंत्री सदाभाऊ खोत सत्कार व मेळावा पार्श्‍वभूमीवर विकास आघाडीवर केलेल्या टीकेला नगराध्यक्ष पाटील यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, ""चांगल्या कामात दोष शोधून टीका करण्याची आमदार जयंत पाटील यांची पद्धत आहे. जयंत पाटील यांच्याकडे 15 वर्षे मंत्रिपद असताना अनेक शासकीय कार्यक्रम झाले. त्या वेळी खासदार राजू शेट्टी यांना त्यांनी किती वेळा बोलवले, नावाच्या वेगळ्या पत्रिका छापायच्या आणि त्या उशिरा मिळाव्यात म्हणून पोस्टाने पाठवायचा उद्योग त्यांच्या काळात झाला. आमदार पाटील यांनी थेट टीका करावी. त्यांच्या प्रत्येक टीकेला त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल. विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आता त्यांना भीक घालणार नाहीत. मंत्री खोत यांच्या 30 वर्षांच्या तपश्‍चर्येतून आज फळ मिळाले आहे. त्यांचे अनेक ठिकाणी, अनेक वेळा सत्कार होऊ शकतात. त्यांच्यावर स्थानिक नेत्यांनी टीका करणे हस्यास्पद आहे.''

त्यांना शोभत नाही
एखाद्या कामाचे उद्‌घाटन एकदाच होते, असे सांगून नगराध्यक्ष पाटील म्हणाले, ""आमदार जयंत पाटील यांनी नगरपालिका फंडातील कामाचे दोनदा उद्‌घाटन केले हे त्यांना शोभत नाही.''