मुख्यमंत्र्यांचा कोणा एकट्यावर भरवसा नाही : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

सांगली - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परदेश दौऱ्यावर जाताना प्रभारी मुख्यमंत्रिपदासाठी मंत्री गटाची समिती नेमली. बहुतेक त्यांचा कुणा एकावर भरवसा दिसत नाही. मात्र मंत्रिगटाकडे असा अधिकार देण्याचा पहिलाच प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे केली. 

सांगली - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परदेश दौऱ्यावर जाताना प्रभारी मुख्यमंत्रिपदासाठी मंत्री गटाची समिती नेमली. बहुतेक त्यांचा कुणा एकावर भरवसा दिसत नाही. मात्र मंत्रिगटाकडे असा अधिकार देण्याचा पहिलाच प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे केली. 

मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर जाताना एक ओळीचे पत्र करून एकट्याकडे राज्याची जबाबदारी देतात. मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिघांकडे जबाबदारी दिली आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे. पण त्यांचा एकट्यावर भरवसा दिसत नाही’, अशी उपरोधिक टीका पत्रकार परिषदेत त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलेल्या धमकीच्या पत्रावरूनही त्यांनी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था असते. त्यांच्या सुरक्षेची चिंता करण्याचे कारण नाही. त्यांना धमकीचे पत्र आले असेल तर ते उघड करण्याचा उद्देश काय? त्याची तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला पाहिजे. निनावी पत्राला किती महत्त्व द्यायचे? त्याचा उगीच बाऊ केला जातोय ते योग्य नाही.’’

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे हल्लाबोल सभेत स्वागत झाले. ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्यावरील कुठलाही आरोप सिद्ध न होता त्यांना तुरुंगवास झाला. त्यांनी हालअपेष्टा भोगल्या. तरीही जेलमध्ये असतानाही ते पक्षाची चिंता करत होते. 

दलित चळवळीच्‍या बदनामीचा प्रयत्न
भीमा-कोरेगाव प्रकरणावरून एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांचा पाठिंबा असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर पाटील म्हणाले, कोणत्या घटनेला कोणत्या दिशेने न्यायचे, कोणती माहिती समाजासमोर मांडायची आणि दिशाभूल करायची असे प्रयत्न होताना दिसत आहेत. जाणीवपूर्वक एखादी चळवळ बदनाम करण्याची, त्यांच्या प्रमुखांना अटक करण्याचे षडयंत्र सरकार करत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलण्याचे प्रयत्न होत असल्याची समाजाची भावना झाली आहे.

Web Title: Sangli News Jayant Patil comment