ज्यूनिअर आर आर आबा

विजय पाटील
शुक्रवार, 25 मे 2018

हुबेहूब माजी गृहमंत्री स्व.आर आर पाटील यांच्या शैली आणि हावभावात रोहित पाटील यांच्या भाषणात दिसून येते. त्यांनी भाषण करीत आबांवर प्रेम करणाऱ्या तासगावच्या जनतेच्या भावना जिंकल्या आहेत.

सांगली - आपल्या भाषणाने सर्वांचे मन जिंकून घेणारे आणि अंतकरणातून भाषण करून सर्वांना समाधानी ठेवणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना आजही कोणी विसरू शकत नाही. आबा आपल्यातून निघून गेलेत हे जरी कटू सत्य असले तरी आबांचे पुत्र रोहित पाटील हे ज्यूनिअर आर आर आबा म्हणून समोर आले आहेत.

हुबेहूब माजी गृहमंत्री स्व.आर आर पाटील यांच्या शैली आणि हावभावात रोहित पाटील यांच्या भाषणात दिसून येते. त्यांनी भाषण करीत आबांवर प्रेम करणाऱ्या तासगावच्या जनतेच्या भावना जिंकल्या आहेत.

एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात रोहित पाटील यांनी भावनिक आणि मार्गदर्शक असे आबांच्या सारख्या शैलीत केलेल्या भाषणाला जनतेने सुद्धा दाद दिली. यावरून रोहित पाटील यांच्या वक्तृत्वात आबांची छबी अवतरल्याचे दिसून आले. रोहित पाटील भाषण करताना तासगावच्या जनतेला आर आर आबांची आठवण आली. रोहितदादा पाटील यांच्या भाषणाचा हाच तो व्हायरल व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Sangli News Juniour R R Patil aaba