कराड - आटपाडी एसटी बसला डंपरची धडक, तीन ठार

विजय पाटील
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सांगली - विटा जवळील रेवणगांव घाटात धोकादायक वळणात एसटी आणि डंपरची धडक झाली. या अपघातात महिलेसह ३ जण ठार झाले आहेत तर ४ जण गंभीर जखमी आहेत.

सांगली - विटा जवळील रेवणगांव घाटात धोकादायक वळणात एसटी बस आणि डंपरची धडक झाली. या अपघातात महिलेसह ३ जण ठार झाले आहेत तर ४ जण गंभीर जखमी आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  रेवणगांव घाटात धोकादायक वळणे आहेत. एक वळणावर कराड -आटपाडी एसटी ( एमएच 12 सीएच 7670) याबसला आणि विटाकडून येत असलेल्या डंपरची ( एमएच 10 ए डल्बु 2767) धडक झाली. या धडकेनंतर डंपर रस्त्याच्या बाजूला उलटला. तर एसटीला बसलेल्या घडकेत तीन प्रवासी जागीच ठार झाले.

मृतांची नावे अशी - विजय जालिंदर कुंभार ( रा. खानापूर), तानाजी विलास जाधव (भडकेवाडी, ता. खानापूर) , सुनदा उत्तम यादव (वाटबरे,  ता. सागोला. जि.सोलापूर) 

या घटनेत चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना विटा आणि खानापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... 

Web Title: Sangli News Karad-Atpadi Bus accident near Vita