कोल्हापूर ते बीदर नवी साप्ताहिक एक्‍सप्रेस लवकरच

संतोष भिसे
शुक्रवार, 4 मे 2018

मिरज, ता. 4 : कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस लवकरच सुरु होत आहे. मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव पाठवला होता, त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. 

मिरज, ता. 4 : कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस लवकरच सुरु होत आहे. मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव पाठवला होता, त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. 

वीस डब्यांची ही गाडी ( 11415) प्रत्येक बुधवारी रात्री 11.35 वाजता कोल्हापुरातून सुटेल. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी 10.15 वाजता बीदरमध्ये पोहोचेल. दिड तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पावणेबारा वाजता परत कोल्हापूरसाठी (क्रमांक 11416) सुटेल, रात्री 12.35 वाजता कोल्हापुरात पोहोचेल. 

या गाडीला भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, पंढरपूर आणि मिरज हे थांबे आहेत. एकूण वीस डबे असून नऊ स्लिपर, तीन वातानुकुलीत, सहा जनरल डब्यांचा समावेश आहे. 

या गाडीला क्रमांक मिळाल्याने कायमस्वरुपी धावणार आहे. कोल्हापूर-नागपूर ही एक्‍सप्रेस कोल्हापुरात चार दिवस थांबून असते, या काळात ती कोल्हापूर - बीदर एक्‍सप्रेस म्हणून धावेल. गाडी कधीपासून धावेल हे मध्य रेल्वेने अद्याप स्पष्ट केलेले नाही, मात्र पंधरवड्यात सुरु होण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

पाठपुराव्याला यश 
प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील आणि प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, या गाडीसाठी बरेच दिवस पाठपुरावा सुरु होता. या गाडीने पश्‍चिम महाराष्ट्र कर्नाटकशी जोडला जाणार आहे. प्रवाशांची चांगली सोय होईल. 

Web Title: Sangli News Kolhapur - Bidar weekly Railway