करिअरच्या वाटा आजपासून खुल्या

करिअरच्या वाटा आजपासून खुल्या

सकाळ-लक्ष्य प्रदर्शन - आयआयटी, जेईई, एनडीए, स्पर्धा, वैद्यकीय प्रवेशाची सखोल माहिती

सांगली - सकाळ माध्यम समूह तमाम सांगलीकरांसाठी शैक्षणिक संधींचा खजिना घेऊन येत आहे. करिअरची योग्य दिशा दाखवणाऱ्या ‘सकाळ लक्ष्य’ प्रदर्शनाचे उद्या (ता. २) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. ५ जूनपर्यंत चालणारे हे प्रदर्शन नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर होईल; तर आपल्या पाल्याचा यशस्वी करिअरसाठी नक्कीच भेट द्या, असे आवाहन केले आहे.

‘सकाळ’ने आयोजित केलेले करिअरविषयक प्रदर्शन नेहमीच दर्जेदार आणि मार्गदर्शक ठरणारे असते. त्यामुळे प्रदर्शनाची उत्सुकता काही दिवसांपासून होती. यंदा प्रदर्शनाचे ११ वे वर्ष आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास आहे. करिअरिस्ट विद्यार्थ्यांना संधी काय आहेत, याची सर्वांगीण माहिती देणारे ‘सकाळ’चे हे एकमेव प्रदर्शन आहे.

सांगलीसह कोल्हापूर, पुणे-मुंबईतील दर्जेदार शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहेत. यंदाही तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, समुपदेशन अशी रेलचेल असेल. अभियांत्रिकीच्या विविध शाखा, त्यांची बदललेली प्रवेशप्रक्रिया, वैद्यकीय शाखेची प्रवेशप्रक्रिया, एमबीएचा कोर्स, सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञानची सखोल माहिती देणाऱ्या दर्जेदार संस्थांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचेही स्वतंत्र व्यासपीठ आहे. विविध विद्या शाखांसाठी उपयुक्त क्‍लासेसचीही माहिती इथे दिली जाईल. यंदाही लहान मुलांच्या इंग्लिश माध्यम स्कूलचा प्रदर्शनात समावेश केला आहे. एकाच छताखाली पालक, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधींचा खजिना खुला करण्यात येणार आहे.

हे आहेत प्रायोजक 
पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. सरस्वती आयआयटी ॲकॅडमी, क्‍लिअर कन्सेप्ट ट्युटोरियल्स, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी (आष्टा), आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (विटा), डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयसिंगपूर) आणि शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (यड्राव) सहप्रायोजक आहेत. 

एक नजर 
प्रदर्शन २, ३, ४ व ५ जून 
नेमिनाथनगर येथील कल्पद्रुप क्रीडांगण ठिकाण 
सर्वांना मोफत प्रवेश 
सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत 
प्रदर्शन खुले 
माहितीसाठी संपर्क-राहुल कुलकर्णी (९८२२५३३४५५), परितोष भस्मे (९७६६२१३००३) 

आजचे व्याख्यान
वक्ते : डॉ. अभंग प्रभू
विषय : इंजिनिअरिंग/मेडिकल प्रवेश परीक्षा
वेळ : सायं. ५ ते ६ 
वक्ते : प्रा. महेश थोरवे     
विषय : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

वेळ : सायं. ६ ते ७ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com