भेंडवडेत लक्ष्मी जानकर विजयी

प्रताप मेटकरी
सोमवार, 28 मे 2018

विटा - भेंडवडे ग्रामपंचायत निवडणूकीत टायगर ग्रुपचे जिल्हा संपर्कप्रमुख राजू जानकर यांच्या नेतृत्त्वात सरपंचपदाची निवडणूक जिंकत चार जागावर विजय संपादन केला आहे. राजू जानकर यांच्या मातोश्री लक्ष्मी जानकर यांनी ३७ मतांनी सरपंच पदाची निवडणूक जिंकली आहे. 

 गावठाण भेंडवडे येथे राजू जानकर यांचा नेतृत्त्वात टायगर ग्रुप, माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी आणेि शिवसेनेचे पॅनेल अशी तिरंगी लढत झाली. अत्यत अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या सरपंचपदासाठीच्या लढतीत राजू जानकर यांच्या मातोश्री लक्ष्मी नानासो जानकर यांना 475 तर किसन जानकर यांच्या स्नुषा ऋतुजा उत्तम जानकर यांना 438 मते मिळाली.

सदस्य पदाच्या निवडणूकीत  टायगर ग्रुपने 4 जागा, शिवसेनेने 3 जागा तर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने 2 जागावर विजय संपादन केला आहे.

Web Title: Sangli News Laxmi Jankar wins