सांगली शहरात आज वाहन बंदी

सांगली शहरात आज वाहन बंदी

सांगली - सांगली शहरात उद्या (रविवारी) लिंगायत समाजाचा महामोर्चा होणार आहे. यासाठी सांगलीसह बाहेरच्या जिल्ह्यांतूनही बहुसंख्य लिंगायत बांधव मोर्चासाठी शहरात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मोर्चानिमित्त शहरात वाहन आणण्यास बंदी केली आहे.

लिंगायत समाजाचा महामोर्चा सकाळी अकरा वाजता विश्रामबाग येथून निघणार आहे. त्यासाठी सांगलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने नागरिक शहरात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी नागरिकांना शहरात वाहन आणण्यास सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत बंदी केली आहे. तसेच वाहन पार्किंगचेही नियोजन केले आहे. पोलिस वाहने, ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची वाहने यातून वगळण्यात आली आहेत.

बंदी केलेले रोड व ठिकाणे 
विजयनगर ते विश्रामबाग चौक, टाटा पेट्रोल पंपाकडून विश्रामबाग चौक, शंभर फुटीकडून अय्यंगार बेकरीकडे, आलदर चौक ते खरे मंगल कार्यालयाकडून आदित्य हॉस्पिटलकडे येणारा रोड, हनुमान हॉटेलकडून पै प्रकाश हॉटेलकडे येणारा रोड, रेल्वे फाटकाकडून विश्रामबागकडे येणारा रोड, विश्रामबाग गणपती मंदिराकडून बाटा शोरुमकडे येणारा रोड, मंगळवार बाजारकडून जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याकडे येणारा रोड.

पर्यायी वाहतूक मार्ग 
मिरजकडून सांगली शहरात येण्यासाठी ः विजयनगर-हसनी आश्रम-स्फूर्ती चौक-१०० फुटी मार्गे एसटी स्टॅंड. विश्रामबाग गणपती मंदिराकडे जाणारा शंभर फुटी रोड, टाटा पेट्रोल पंप-नेमीनाथ नगर-शंभर फुटी रोड, एसटी स्टॅंड सांगलीकडे.

मिरजकडे जाण्यासाठी : एसटी स्टॅंड-सिव्हिल हॉस्पिटल-माळी मंगल कार्यालय-१०० फुटी रोड-स्फूर्ती चौक-हसनी आश्रम-विजयनगर-मिरज
 मिरजकडे जाण्यासाठी : मार्केट यार्ड-शिंदे मळा-लव्हली सर्कल-लक्ष्मी मंदिर-भारत सूतगिरणी-मारुती मंदिर-मिरज

पार्किंग व्यवस्था 
भोकरे कॉलेज, वानलेसवाडी पोलिस चौकीसमोरील मैदान, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय मैदान, वालचंद महाविद्यालय मैदान, कांतीलाल प्रशाला मैदान

इस्लामपूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, इमॅन्युअल स्कूल.

कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी : नेमीनाथनगर कल्पद्रुम मैदान, नेमीनाथ पतसंस्थेसमोरची जागा

तासगावकडून येणाऱ्या वाहनांसाठी : सह्याद्रीनगर, दत्तनगर, वसंतदादा कुस्ती केंद्र, लक्ष्मी मंदिर, चिन्मय पार्क, १०० फुटी दोन्ही बाजू, न्यू महाराष्ट्र हायस्कूल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com