दुष्काळी माणगंगा नदीत प्रथमच झाले 'बोटिंग'

गणेश जाधव
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघ व लोकसहभागातून माणगंगा स्वच्छ झाली. या दुष्काळी माणगंगेच्या पात्रात बोटिंग करण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच अमोल मोरे यांनी पुढाकार घेऊन आज माणगंगेच्या पात्रात बोट चालवून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर व तानजीराव पाटील यांच्या हस्ते बोटिंगचा प्रारंभ केला.

दिघंची : आटपाडी तालुका म्हणजे कायम दुष्काळी परंतु यावर्षी परतिच्या माणसून ने दिलासा दिल्याने सगळीकडे समाधानकारक वातावरण आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंचीला माणगंगेचे मोठे पात्र लाभले आहे. नेहमी दुष्काळी असणारी माणगंगा यावर्षी वाहती झाली. आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघ व लोकसहभागातून माणगंगा स्वच्छ झाल्याने या दुष्काळी माणगंगेच्या पात्रात बोटिंग करण्यासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले सरपंच अमोल मोरे यांनी  पुढाकार घेऊन आज माणगंगेच्या पात्रात बोट चालवून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर व तानजीराव पाटील यांच्या हस्ते बोटिंगचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अमोल मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या पुढाकराने लोकसहभागतुन माणगंगा नदी व गाव ओढा स्वच्छता करण्यात आली. चिलारी झुडूपात हरवलेली माणगंगा ने मोकळा श्वास घेतला. यावर्षी परतीच्या माणसून पावसाने माणगंगा वाहती झाली. तब्बल 9 वर्षानि माणगंगा वाहती झाली. माणगंगा नदीच्या पात्रावरील यादव वस्ती बंधरा देखील पूर्ण क्षमतेने भरला. स्वच्छता व खोलिकरन केल्याने माणगंगा नदीचे पात्र विस्तारले आहे. सरपंच अमोल मोरे यानी पुढाकार घेऊन माणगंगा पात्रात आज जलसफरीची सुरुवात केली. अनेक दिघंचीतील ज्येष्ठ नागरिकांना माणगंगा ची सफर घडवून या ऐतिहासिक बोटिंग  ची सुरुवात करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले की, कायम दुष्काळी असणाऱ्या माणगंगेमध्ये जलसफर ही गोष्ट स्वप्नवत आहे. अमोल मोरे यानी पुढाकार  एक वेगळा अनुभव या सम्पूर्ण दुष्काळी भगाला दिला आहे. या जलसफरी आनंद लोकांनी घ्यावा.
माजी जिल्हा परिषद सदस्य तानजीराव पाटिल म्हणाले की सरपंच अमोल मोरे यानी आपल्या भागातील लोकांना देखील बोटिंग चा अनुभव व आनंद घेता यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. दुष्काळी माणगंगा नदित बोट फिरने म्हणजे एक नवीन इतिहास झाला आहे. वर्षानुवर्षे आपला भाग दुष्काळी आहे. परंतु पावसाने आलेल्या पाण्याने देखील बोटिंग ची संधी दिघंचीत अमोल मोरे यांच्यामुले उपलब्ध झाली आहे.

सरपंच अमोल मोरे म्हणाले की, खास बोटिंग ची सफर अनुभवन्यासाठी आपल्या भागातील लोक बाहेर जातात . परंतु आपल्या भागात देखील कमी पाण्यात ही सेवा देवून आपल्या ग्रामीण भागत देखील आपण जलसफ़रिचा आनंद घेवू शकतो.   यावेळी जनार्धन झिम्बल, बाळासाहेब होनराव, साहेबराव पाटिल, राहुल पांढरे, राहुल वाघमारे, माणिक पांढरे, जितेंद्र मोरे, शेखर मिसाळ, संतोष मोरे, विजय जावीर, चंद्रकांत माइनकर , हसन तांबोळी, काकासाहेब शेटे व इतर नागरिक उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: sangli news manganga river boating begun