बनावट दुधाच्या मास्टर माईंड डॉक्‍टरबाबत ‘अलर्ट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

सांगली -  बनावट दुधाचा कारखाना चालविणाऱ्यांना डोर्लीतील बबन देशमुखसारख्या धेंडांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्‍टरची माहिती मिळविण्यासाठी अन्न प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. हा डॉक्‍टर सातारा भागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अन्न प्रशासनाला पत्राद्वारे ‘अलर्ट’ केले आहे. कुणाकडे या डॉक्‍टरबद्दल माहिती असल्यास कळवावे, असे आवाहन केले आहे. 

डोर्लीतील बनावट दुधाचा कारखाना उघडकीस आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. ‘सकाळ’ आणि ‘साम’ने या विष फॅक्‍टरीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यातून राज्यात सुमारे १५ टक्के दूध भेसळयुक्त असल्याची धक्कादायक माहिती खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केली. या बनावट दूधनिर्मिती करणाऱ्यांना मार्गदर्शन कोण करते? त्यांच्याकडून विषाची फॅक्‍टरी अशी राजरोजपणे व सहज पद्धतीने कशी चालवली जाते, याविषयी याआधीही शंका आल्या होत्या.

त्या वेळी एका डॉक्‍टरकडून या धेंडांना फॉर्म्युला सांगितला गेल्याची माहिती पुढे आली होती. दुर्दैवाने अन्न प्रशासनातील तत्कालीन व्यवस्थेने त्याचा माग घेतला आहे. त्यानंतर बागणीतील बनावट दुधाचा कारखाना उघडकीस आला. डोर्लीत बबनचा भाऊ बाळासाहेब याच्या बनावटगिरीवर छापा पडला. आता बबनचा पर्दाफाश झाला. त्याच्या मुळाशी जाताना ‘डॉक्‍टर फॅक्‍टर’ समोर आला आणि पुन्हा त्याचे जुने संदर्भ शोधण्याची गरज या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटली. त्याबाबत सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे यांनी एक सकारात्मक पाऊल उचलत ‘त्या’ डॉक्‍टरचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी सातारा अन्न प्रशासनाशी संपर्क साधून ‘अलर्ट’ केले आहे.

खवा प्रकरणात एसटी अडचणीत
खवा आणि बर्फीची एसटीच्या पार्सलद्वारे वाहतूक केल्याने एसटी महामंडळासह पार्सल विभाग अडचणीत आला आहे. अन्न प्रशासनाने एसटीला पत्राद्वारे त्याचा खुलासा मागविला असून, पार्सल कंपनीला आरोपी बनविले आहे. अन्नाची वाहतूक असुरक्षित पद्धतीने होत असेल, भेसळ असेल तर तातडीने अन्न प्रशासनाला कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: sangli news Milk adulteration