सांगलीत माकडाने केला कुत्र्यांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सांगली - येथील नर जातीच्या माकडाने कुत्र्यांवर हल्ला चढवला. त्यात दोन कुत्री ठार झाले असून एक कुत्रे जखमी झाले आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

सांगली - येथील नर जातीच्या माकडाने कुत्र्यांवर हल्ला चढवला. त्यात दोन कुत्री ठार झाले असून एक कुत्रे जखमी झाले आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

शाहू उद्यानजवळील एका झाडावर असणारे नर जातीच्या माकडाने दुपारी कुत्र्यावर हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्या माकडाने शांतीनगर भागातील दोन कुत्र्यांवर हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाली. याची माहिती कळताच इन्साफ फाऊंडेशन व त्याचे प्रमुख मुस्तफा मुजावर घटनास्थळी पोहोचले.

वनविभागाच्या सहाय्याने जखमी कुत्र्यावर तत्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर त्या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने  सापळा रचला आहे. आजही सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडण्यासाठी प्रयत्न केला. परंतु ते माकड हाती आले नाही. दोन ते तीन वर्षांचे ते माकड असल्याचे प्राणिमित्र मुजावर यांनी सांगितले.

Web Title: Sangli News monkey attach on dog