दिघंचीत बाजारपेठेत माकडांचा धुमाकूळ

गणेश जाधव
गुरुवार, 19 जुलै 2018

दिघंची - दिघंची येथे चार माकडांनी बाजारपेठेतील दुकांनात धुमाकुळ घातला. तीन माकडांनी एक माकडावर हल्ला चढवला त्यात स्वतः चा जीव वाचण्यासाठी त्या माकडाने एका दुकानाचा आसरा घेतला. त्या दुकानात भीतीने त्याने तब्बल 2 तास ठिय्या मांडला. त्याआधी तीन चार दुकानात या चार माकडांनी धुमाकूळ घातला. अचानक घडलेल्या प्रकाराने व्यापाऱ्यांनी तब्बल तीन तास दुकाने बंद ठेवणे पसंद केले.

अचानक आलेल्या माकडांच्या टोळक्याने तब्बल तीन तास दिघांचीत अक्षरशः धुमाकूळ घातला. यावेळी माकडांच्या पळापळीत एक महिला देखील जखमी झाली. एका भांड्याच्या दुकानातीस सामान माकडांनी सामान विस्कटले, तर शेवटी एका माकडाने रेणुका गिफ्ट सेंटर येथे  आसरा घेतला. त्याने तब्बल 2 तास तेथे ठिय्या मांडला. वनीकरण खात्याचे कर्मचारी आल्यानंतर माकडाने तेथून पळ काढला. तोपर्यंत माकडांची भांडणे बघण्यासाठी दिघंचीकरांनी मोठी गर्दी केली होती.
  
 या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य प्रणव गुरव व  अॅडव्होकेट अशपाक अत्तार यांनी वन खात्याशी संपर्क केला. त्यांनंतर वन कर्मचार्यांनी येण्यास विलंब लावताच गुरव यांनी कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांना संपर्क करून या घटनेची माहिती दिली. त्यांनंतर वन कर्मचारी पिंजरा व गाडी घेऊन हजर झाले.

वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा आणून जाळीच्या सहाय्याने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु जमलेली लोकांची गर्दी व तोकडी जागा यामुळे माकडांनी निसुटून पळ काढला.

Web Title: Sangli News Monkey in Dihanchi market