अपघातातील मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत जाहीर

कोल्हापूरात नागाव फाट्याजवळ अपघातामध्ये पाच विद्यार्थी ठार
कोल्हापूरात नागाव फाट्याजवळ अपघातामध्ये पाच विद्यार्थी ठार

नागाव फाट्यावरील अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत

सांगली: शिवजयंती निमित्त पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात असताना, आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजता पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. तर 16 जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.

कोल्हापूरजवळ झालेल्या या अपघातात ठार झालेले आणि जखमी झालेले सर्व विद्यार्थी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे आहेत. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ तातडीने कोल्हापूरला गेले. सीपीआर इस्पितळात जाऊन त्यांनी अपघाताची माहिती घेतली. जखमींची विचारपूस केली. त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करुन अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच जखमींवर मोफत औषधोपचार करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.  

अपघातातील सर्व विद्यार्थी सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाचे असल्याचे समजल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, भाजपचे सरचिटणीस आणि वालचंदचे शासकीय सदस्य मकरंद देशपांडे, दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन भेट दिली. तसेच सीपीआरमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांची चौकशी करुन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना आमदार गाडगीळ यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com