थेट सरपंचपदासाठी राजकीय पक्षांना आता नो एंट्री!

विष्णू मोहिते
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

जनतेतील संभ्रम दूर - जिल्ह्यातील ४५८ गावांत नोव्हेंबरमध्ये उडणार राजकीय धुरळा

सांगली - स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीने आगामी पाच महिने ढवळून निघणार आहे. राज्यात या काळात सव्वाचार हजार तर जिल्ह्यातील ४५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. थेट नगराध्यक्ष निवड... थेट सरपंच निवड...

जनतेतील संभ्रम दूर - जिल्ह्यातील ४५८ गावांत नोव्हेंबरमध्ये उडणार राजकीय धुरळा

सांगली - स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीने आगामी पाच महिने ढवळून निघणार आहे. राज्यात या काळात सव्वाचार हजार तर जिल्ह्यातील ४५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. थेट नगराध्यक्ष निवड... थेट सरपंच निवड...

बाजार समिती निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार... असे निर्णय राज्य शासनाने घेतले. मात्र थेट नगराध्यक्ष निवडणुकीत राज्य शासनाने पक्षांचे चिन्ह वापरले. स्थानिक स्वराज्य संस्थेतही राज्य शासन थेट पक्षाचे  चिन्ह वापरण्यासाठी अधिसूचना काढली जाणार, अशी गेले काही दिवस चर्चा सुरू होती. गावच्या स्थानिक राजकारणात स्थानिक पक्षांना एंट्री नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदारांतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाला मुक्त चिन्ह घ्यावे लागेल. राजकीय पक्षांसाठी राखीव असलेले चिन्ह घेता येणार नाही. त्यामुळे गावाच्या राजकारणात राजकीय पक्षांना नो एंट्री कायम राहिली आहे. 

ऑक्‍टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत राज्यातील चार हजार १२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपासूनच जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. जनतेतून सरपंच निवडण्यासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाची  तयारी अंतिम टप्प्यात आहे. जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाबाबत असलेले संभ्रम दूर करण्यात आले आहेत. 

ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता आमूलाग्र बदल  झाला आहे. सदस्यांमधून सरपंच निवडण्याऐवजी थेट मतदारांतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्या दृष्टीने कायदेशीर सुधारणा केल्या आहेत. मतदारांतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाला मुक्त चिन्ह घेऊनच निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यासह इतर राजकीय पक्षांसाठी राखीव असलेले चिन्ह घेता येणार नाही. यामुळे गावाच्या राजकारणात राजकीय पक्षांना नो एंट्री असणार आहे. 

चिन्हाचे वाटप असे 
सरपंचपदाच्या उमेदवारांना यादीतील प्रथम चिन्हांचे वाटप.
सरपंचपदाच्या उमेदवाराला वाटलेले मुक्त चिन्ह गोठवले जाणार. 
सरपंचाचे चिन्ह, प्रभागातील उमेदवारांना देण्यावर निर्बंध. 
सरपंचाचे चिन्ह आणि ग्रामपंचायत सदस्यांची चिन्हे वेगळी राहणार.

पश्चिम महाराष्ट्र

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयींमुळे सर्वसामान्य नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसह त्यांच्या...

02.39 AM

कऱ्हाड - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत जागर युवा संवाद कार्यक्रमाद्वारे...

01.39 AM

सोलापूर - प्राप्त स्थितीशी सामना करत समर्थ बनून सक्षम व उद्योजिका बनण्याचा कानमंत्र लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील...

12.24 AM