पलुस तालुक्यातील सुखवाडीत एकावर मगरीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

भिलवडी - सुखवाडी (ता. पलूस) येथे  कृष्णेत मगरीच्या हल्ल्यातून एकजण बचावला. त्याच्या डाव्या हाताचा मगरीने चावा घेतला. भीमराव दत्तू पाटील महाराज (वय ६५) असे त्यांचे नाव आहे.

भिलवडी - सुखवाडी (ता. पलूस) येथे  कृष्णेत मगरीच्या हल्ल्यातून एकजण बचावला. त्याच्या डाव्या हाताचा मगरीने चावा घेतला. भीमराव दत्तू पाटील महाराज (वय ६५) असे त्यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. पाटील सुखवाडी येथील संतोष भारती मठात पूजापाठ करतात. आज पहाटे साडेपाच वाजता ते नेहमीप्रमाणे कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर गेले होते. कमरेइतक्‍या पाण्यात आंघोळीसाठी गेले असता मगरीने पाठीमागून हल्ला चढवला. डाव्या मांडीचा चावा घेत असताना त्यांनी डाव्या हाताने झटकले. त्या वेळी मगरीने करकचून चावा घेतला. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

या घटनेची भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून वनविभालाही माहिती देण्यात आली. गेल्या पाच वर्षांत सुखवाडी परिसरात मगरीच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी चोपडेवाडी पाणवठ्यावर सूरज यादव हा शाळकरी मुलगा आई समोरच मगरीच्या हल्ल्यात बळी पडला. त्यानंतर वनखाते खडबडून जागे झाले. मगरीला पकडण्यासाठी महिनाभर मोहीम राबवली. मगरीचा वावर असणाऱ्या परिसरात लोखंडी पिंजरे ठेवण्यात आले. पाणवठ्यावर वनरक्षक तैनात केले, सहा महिन्यांत मगर जेरबंद झाली नाही.

Web Title: Sangli News one person injured by crocodile attack in Sukhawadi