एक टन वजनाचा बैल पलूसच्या प्रदर्शनात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पलूस -  क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पलूस येथे आयोजित क्रांती कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एक टनाची गाडी ओढणारे कुत्रे, एक टन वजनाचा बैल व शंभर किलो वजनाचे बोकड, उसाच्या विविध जाती हे प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. 

प्रदर्शनामध्ये बुल टेरिअर जातीचे विदेशी कुत्रे तब्बल एक टनाची गाडी ओढते. तसेच एक टन वजनाचा बैल तसेच पलूस येथील अण्णा सिसाळ यांच्या मालकीच्या 100 किलो वजनाचा भोर जातीचा बोकड पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. याशिवाय उसाच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, भुईमूग, मिरची, फुले, भाजीपाला ही प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे. शेती अवजारे, वाहने, ठिबक व तुषार सिंचन संच, विविध यंत्रे ठेवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची ही माहिती येथे दिली जात आहे. प्रदर्शना दरम्यान द्राक्ष, ऊसशेती, फुलशेती विषयक व्याख्याने व परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.