तुंगमध्ये दर नसल्याने उभ्या मिरचीच्या पिकावर फिरवला रोटर

विजय पाटील
सोमवार, 4 जून 2018

सांगली - शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आंदोलन करत आहे. पण शासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे असे दिसते. अशा परिस्थितीत शेतमालाला दर नसल्याने शेतकऱ्यांना उभा पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. सांगली जिल्ह्यातील तुंग येथील रावसाहेब कदम यांनी उभ्या मिरचीच्या पिकावर आज रोटर फिरवला.

रावसाहेब कदम यांनी एका एकरावर मिरचीचे पिक घेतले होते. या पिकासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. सध्या मिरचीला सहा रुपये किलो इतका दर आहे. इतक्या कमी दरात उत्पादन खर्चतर सोडाच वाहतुकीचाही खर्च निघणे कठीण आहे. 

मिरचीला प्रति किलो वीस रुपये इतका दर असणे गरजेचे होते पण सहाच्यावर दरच मिळत नाही. यातून मिरचीचा तोडणीचा खर्च निघणे कठीण असल्याने उभ्या पिकावर रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला. 

- रावसाहेब कदम, शेतकरी,  तुंग

Web Title: Sangli News plough on Chili crop