पोस्ट कर्मचारी संपामुळे ग्रामीणचा कारभार ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली - पोस्टांच्या कर्मचाऱ्यांसाठी नेमलेल्या कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी संघटनेने सुचवलेल्या बदलासह तातडीने लागू करावा, यासह मागण्यांसाठी जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्रामीण पोस्ट कर्मचारी संघटना आजपासून संपात उतरली. 390 पैकी 260 कर्मचारी संपात आहेत. ग्रामीण भागातील 260 पैकी 225 कार्यालये बंद असल्याचा दावा संघटनेने केला आहे. 

जिल्हाध्यक्ष बी. टी. यादव, उपाध्यक्ष अशोक इचल, चवगौंडा पाटील, विठ्ठल पाटील, राजेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. संघटनेच्या मागण्या - ग्रामीण कर्मचाऱ्यांना आठ तास शासकीय सेवेत काम द्यावे, त्यांना खात्यांत समावून घ्या. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उद्दिष्टाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा झळ थांबवावा. 

संपामुळे ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले आहेत. सेव्हिंग खात्यासह टेलिफोन बिले, विद्युत बिलांचा भरण्यावरही परिणाम झाला.