सांगलीतील विश्रामबागला रस्त्यांना जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सांगली - महापालिका क्षेत्रात हार्ट ऑफ सिटी समजल्या जाणाऱ्या विश्रामबागमधील विस्तारित भागांना जोडणारे मुख्य रस्त्यांना शनिवारी रात्री पावसाने जलसमाधी मिळाली. गव्‍हर्न्मेंट कॉलनी, सहयोगनगर, हसनी अश्रम, विजयनगर भागात तळी साचल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढतांना नागरिकांनी महापालिकेचा शेलक्‍या शब्दांत उद्धार केला. कारभाऱ्यांची टक्केवारीची दिवाळी आणि आमचं दिवाळं अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

शहरात जोराचा एक पाऊस झाली, की शहराची पार दाणादण उडते हे चित्र नवं नाही. शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचतात. त्यातून वाट काढत जाणाऱ्या नागरिकांचे हाल महापालिका उघड्या डोळ्यांनी पाहते, तरीही उपाययोजना केल्या जात नाही. शहराचे हार्ट समजल्या जाणाऱ्या विश्रामबागचीही हीच गत झाली. शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांनाही नरकयातना भोगव्या लागतात, याची खंत नागरिकांना वाटते.

विश्रामबागमधून गव्हर्मेंट कॉलनी, सहयोगनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची पार वाट लागली. पावसाचे पाणी गुडघाभर साचून राहिल्याने वाहनचालकांसह नागरिकांना कसरत करावी लागत आहे. पर्यायी एसटी कॉलनी रस्त्यावरही हीच बोंब आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. छोटे-मोठे अपघातही नित्याचे झालेत. नागरिकांचा जीव जाण्याची वाट ही महापालिका प्रशासन पाहते का ? असा सवाल भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

कारभारी मिरवतात...
स्फूर्ती चौकापासून रस्त्यांचे डांबरीकरण झाली आहे. मात्र स्फूर्ती चौक ते विश्रामबाग रस्त्याच्या रुंदीकरणाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने नागरिकांचा त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या ढिसाळ, दिरंगाई कारभारामुळे रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. भागातील कारभारीही त्यासाठी पाठपुरावा करीत नाहीत. ते केवळ निवडणूकीच्या प्रमोशनचे कार्यक्रमात व्यस्त आहे.