तर गणेशोत्सवात दूधकोंडी : शेट्टी

तर गणेशोत्सवात दूधकोंडी : शेट्टी

इस्लामपूर - सरकारने दूधदराबाबत घेतलेल्या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी केली नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर गणेशोत्सवात पुन्हा कोंडी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला.

दूध आंदोलनातील यशाच्या पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांची येथे  वाजतगाजत, फटाक्‍यांच्या आतषबाजी आणि घोषणाबाजीत मिरवणूक काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून श्री. शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  

ते म्हणाले,‘‘राज्यात दुधाचा सध्याचा दर प्रतीलिटर १४ ते २३ रुपये होता. उत्पादन खर्च ३० ते ३५ रुपये असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले. त्यातच पावडरीचे दर पडल्यामुळे पावडर निर्मिती थांबली आहे. राज्यात २२ लाख लिटर दूध अतिरिक्त झाले. त्यामुळे दर पडले. हे दूध सरकारने खरेदी करावे, अशी आमची मागणी होती. या स्पर्धेतही इतर राज्यातील दूध संघ महाराष्ट्रात येऊन आपले दूध विकत होते. इतर राज्य सरकारे उत्पादकांना चार ते पाच रुपये प्रतीलिटर अनुदान देतात. त्यामुळे त्या राज्यातील दूध संघांना महाराष्ट्रात आपल्यापेक्षा कमी दरात दूध विकायला परवडते. इतरांप्रमाणे आपल्या राज्य सरकारने उत्पादकांना प्रतीलिटर पाच रुपये दरवाढ द्यावी, यासाठी आंदोलन झाले. दूध आंदोलन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांपेक्षा सर्व शेतकरी व दूध उत्पादकांनी हातात घेतले. त्यांनी दूध घातले नाही. त्यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. आम्हाला राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक डिवचल्याने टॅंकर फोडावे लागले.’’

ते म्हणाले,‘‘ज्या साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही, त्यांची यादी आम्ही साखर आयुक्तांकडे मागितली होती. साखरेचा लिलाव करून एफआरपी द्यायला भाग पाडू.’’  

आरक्षणाबाबत सरकार उदासीन
शेट्टी म्हणाले,‘‘मराठा व धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. लोकसभेत २०११ मध्ये आरक्षणासाठी मी सर्वप्रथम मुद्दा लावून धरला. धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासीन आहे. याबाबतचा केंद्र सरकारचा लेखी पुरावा माझ्याकडे आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com