शेतकऱ्यांना नको; सांगलीच्या पोलिसांना गोळ्या घाला: शेट्टी

Raju Shetty
Raju Shetty

सांगली : उसाला दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या घालता. निष्पापांना कोठडीत डांबून ठार मारता. त्याआधी अशा हैवान पोलिसांना पहिल्यांदा गोळ्या घाला, अशा संतप्त भावना खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे व्यक्त केल्या.

पोलिसी क्रौर्याचा बळी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची आज त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नगर जिल्ह्यात शेतकरी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा संदर्भ देत त्यांनी पोलिस व राज्य सरकारवर हल्ला चढवला.

ते म्हणाले, "सांगलीतील पोलिस वर्दीतील गुंड म्हणूनच वावरत आहेत. वारणानगरला नऊ कोटींचा दरोडा टाकतात, तरीही त्यांना सेवेतून बडतर्फ केले जात नाही. आता तर ते कोठडीतच सामान्य माणसांना चिरडून मारत आहेत. ते हैवान झाले आहेत. गुंडांना अभय आणि निष्पापांना त्रास हे त्यांचे धोरण आहे. इकडे अनिकेतचा बळी, तर आजच नगर जिल्ह्यात शेवगावमध्ये आक्रमक शेतकऱ्यांवर गोळीबार. सनदशीर मार्गाने लढणाऱ्यांचे आवाज दाबले जात आहेत. आमचे आंदोलन दडपण्यासाठी दबावतंत्राचा वापर करता. त्यामागे कोण आहे, हे लवकरच समजेल. मात्र, लक्षात ठेवा आम्ही न्यायासाठी लढतोय. शेतकऱ्यांचा आवाज दाबलात, तर स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सारे पोलिसच सैतानाप्रमाणे वागत आहेत. अरे शेतकऱ्यांना मारण्यापेक्षा इथल्या वर्दीतील गुंडांना पहिल्यांदा गोळ्या घाला.'' कोथळे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगलीत यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com