खिद्रापुरेच्या एजंटाचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्या प्रकरणातील सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचा एजंट यासिन हुसेन तहसीलदार (रा. तेरवाड, ता. शिरोळ) याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी गुरुवारी फेटाळला. औषध विक्रेता भरत शोभाचंद गटागट (रा. कोल्हापूर रस्ता, सांगली) याला सशर्त जामीन मंजूर केला.

म्हैसाळ (ता. मिरज) येथे महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. नातेवाइकांच्या तक्रारीनंतर डॉ. खिद्रापुरे, पती प्रवीण जमदाडे याला अटक केली. तपासानंतर भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी राज्यासह कर्नाटकात तपास करून रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या 14 जणांना अटक केली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. सरकारने विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे.

गटागट याला सशर्त जामीन मंजूर करताना प्रत्येक मंगळवारी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सातगोंडा पाटीलच्या जामिनावर शुक्रवारी (ता. 14) निर्णय आहे.
या प्रकरणातील अन्य संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर 18 जुलै रोजी न्या. रामटेके यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.