अंत्येष्ठी विधीला विधायकतेची जोड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

वडिलांचा अंत्येष्ठि विधी कर्मकांड न करता सत्यशोधक पद्धतीने केला. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन देखील नदी, तलावांत न करता श्रद्धेसाठी एक मूठ रक्षा विसर्जित केली. व बाकीची रक्षा घरासमोरील व शेतातील झाडांच्या मुळांना रक्षा घातली.

बुधगाव - माजी ग्रामसेवक धोंडिराम नि. पाटील यांच्या निधनांनतर त्यांच्या कुटूंबियांनी पारंपारिक अंत्येष्ठी विधीला विधायकतेची जोड दिली.

धोंडिराम पाटील यांच्या स्मरणार्थ विजय, संजय व महेश पाटील यांनी वडिलांचा अंत्येष्ठि विधी कर्मकांड न करता सत्यशोधक पद्धतीने केला. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन देखील नदी, तलावांत न करता श्रद्धेसाठी एक मूठ रक्षा विसर्जित केली. व बाकीची रक्षा घरासमोरील व शेतातील झाडांच्या मुळांना रक्षा घातली. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना बिस्किट पुड्यांचे वाटप केले. विजय पाटील हे बुलढाणा अर्बन सोसायटीत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. 

मराठा समाजचे खजिनदार ए. डी. पाटील यांनी पाटील कुटूंबियांना मार्गदर्शन केले. मराठा क्रांती मोर्चा (बिसूर) च्या कार्यकर्त्यांनी सहकार्य व संयोजन केले. महादेव पाटील, उदय पाटील, सुभाष पाटील, धोंडिराम पाटील, मोहन पाटील, संजय पाटील, दीपक साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अफजल मुजावर, मुख्याध्यापक बाळूताई पाटील, लता पाटील, मीरा शिंदे, स्मीता यादव, मनिषा पाटील, रामहरी ठोंबरे, नंदा पाटील, शेरकर, मद्वाण्णा आदि उपस्थित होते. 

टॅग्स