सांगली-मिरज ‘धोका’मार्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सांगली - सांगली-मिरज रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अतिशय वेगाने सुरु आहे, मात्र या कामासाठी रस्ते खोदाई करण्यात आल्यानंतर त्याच्या सूचना देणारी अपुरी व्यवस्था  वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागली आहे. हा रस्ता नवा ‘धोका’मार्ग बनला आहे.

सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम सुरु असताना असे अनेक धोके या रस्त्यावर होते, त्यांनी अनेक बळीदेखील घेतले. नेमका तोच प्रकार सांगली-मिरज रस्त्यावर दिसतो आहे. विश्रामबागपासून पुढे या रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला झाडे तोडण्यात आली आहेत. जमीन उकरून त्या भराव टाकला जातोय, काही ठिकाणी विजेचे खांब काढलेत,  काही ठिकाणी तसेच आहेत.

नियमित वाहतूकदारांसाठी ही चिंतेची बाब नाही, मात्र नव्याने या रस्त्यावरून प्रवास करणारा चालक भांबावून जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी हा रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. 

जिथे रस्ता उकरला आहे, तेथे सुरक्षा पट्ट्या लावणे गरजेचे आहे. नसेल तर किमान पांढऱ्या रंगाची वाळूची पोती भरून ठेवण्याचा पारंपारिक पर्यायही आहे. आता पावसाळा सुरु झाले आहे. रस्ते कामाची माती रस्तायवर येवून तो निसरडा होतोय. त्याबद्दल खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही ठिकाणी विजेचे खांब दिसतच नाहीत, त्यावर रिफ्लेक्‍टर लावणे गरजेचे आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कडेगाव - आघाडी शासनाच्या काळात राज्यातील बंद उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू केली होती. योजनेची मुदत...

11.36 AM

मिरज - जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे सर्वेक्षण तीन वर्षांपूर्वी झाले; त्याचे गॅझेट मात्र अद्याप झालेले नाही. या सर्वेक्षणाचे...

11.06 AM

कोल्हापूर -  कर्जमाफी योजनेतील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी घेतलेल्या पीक कर्जाचीही परतफेड करावी लागणार...

10.45 AM