सांगलीत सात पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी : दोघांना अटक

सांगली : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. 3) मध्यरात्री दोघा तरुणांना अटक करुन त्यांच्याकडून सात देशी बनावटीची पिस्तुले आणि 27 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

सांगलीत पत्रकार बैठकीत बोलताना अधीक्षक शिंदे म्हणाले, "स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शंभर फुटीरोडवर गस्त घालत होते. त्यावेळी हॉटेल जय मल्हारसमोर दोन तरुण संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे देशी बनावटीची सात पिस्तुले आणि 27 जिवंत काडतुसे असा तीन लाख 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.''

दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांची नावे सनीदेव प्रभाकर खरात (वय 20, सिंधी बुद्रुक, दहिवडी, ता. माण, जि. सातारा) आणि संतोष शिवाजी कुंभार (वय 27, रा. नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी आहेत. त्यांच्याकडून अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने आणि त्यांच्या पथकाला रोख 15 हजार रुपयांचे बक्षीस श्री. शिंदे यांनी जाहीर केले.

Web Title: sangli news Seven pistols including live cartridges seized