शरद पवार यांनी घेतली खाडेंच्या भूखंड हस्तांतरणाची माहीती

संतोष भिसे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

मिरज -  आमदार सुरेश खाडे यांच्या दास बहुउद्देशीय संस्थेने शासनाकडून मिळवलेल्या साडेपाच एकर भूखंडाची व अतिक्रमणाची माहीती जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली. काँग्रेस व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आज सांगलीत त्यांची भेट घेतली.

भूखंड हस्तांतर प्रक्रियेत तब्बल सतरा शासकीय अटींचा भंग केल्याचे निदर्शनास आणून दिले. साडेपाच एकर भूखंड मिळालेला असतानाही आणखी साडेतीन एकर जागा कुंपण घालून ताब्यात घेतल्याचेही निदर्शनास आणून दिले. 

पंचायत समितीतील काँग्रेसचे पक्षप्रतोद अनिल आमटवणे, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, बाळासाहेब होनमोरे, सुरेश कोळेकर, युवक राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, तुषार खांडेकर, साहेबराव जगताप आदींनी निवेदन दिले. त्यात म्हंटले आहे कि, जमीन हस्तांतरणाला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला असतानाही नियमांचा भंग करुन ती मिळवण्यात आली. खोटी कागदपत्रे, दाखले व पैशांचा वापर झाला. तेवीस अटींपैकी सतराचे उल्लंघन केले. फक्त तीन दिवसांत जिल्हास्तरावर सर्व मान्यता मिळवल्या. साडेपाच एकर भूखंड फक्त साडेपाच लाखांत मिळवला. प्रत्यक्षात दोन कोटी पन्नास लाख रुपये भरणे गरजेचे होते. या जागेवर कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन केले जाणार होते; मात्र त्याची गरज नाही असा दाखला संबंधितांकडून मिळवण्यात आला. जमिनीवर सर्व परवानग्या न घेता बांधकाम केले आहे. आराखड्याला शासनाकडून संपुर्ण मंजुरी घेतलेली नाही. 

संपुर्ण जागेला घातलेले कुंपण हटवावे आणि अतिक्रमण केल्याबद्दल खाडे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. याची माहीती पवार यांनी घेतली. अतिक्रमण, जागा हस्तांतर प्रक्रिया याचीही बारकाईने माहीती घेतली. साडेपाच लाखांत साडेपाच एकर जागेचा व्यवहार झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. यासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेऊ; माहीती व कागदपत्रे घेऊन मुंबईला या असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी आप्पासाहेब हुळ्ळे, अण्णासाहेब कोरे, सुरेश कोळेकर, संजय बजाज, वसंतराव गायकवाड हेदेखील उपस्थित होते.