सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात राष्ट्रपती राजवट आणा - डॉ सबनीस

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात राष्ट्रपती राजवट आणा - डॉ सबनीस

मिरज - महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा साहित्यिक आणि राज्यकर्ते शेपूट घालतात. बेळगावसह कर्नाटक सीमाभागाच्या वादातही हेच घडले आहे. सर्वोच्च न्यायलयात जो काही निकाल लागेल तो लागेल; पण तोपर्यंत हा भाग राष्ट्रपती राजवटीखाली आणा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली. सीमाभागात राहणाऱ्या वीस लाख मराठी बांधवांचे आशीर्वाद मिळवण्याची ही संधी असल्याचेही ते म्हणाले. 

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांगण साहित्यिक व्यासपीठ, मिरज यांच्यावतीने आयोजित केलेल्या 29 व्या साहित्य संमेलनात उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. सुमारे तासभराच्या भाषणात त्यांनी साहीत्यिक, राज्यकर्ते, साहित्य रसिक यासह सर्वांवरच आसूड ओढले. बालगंधर्व नाट्यगृहात अॅड. चिमण लोकूरनगरीत संमेलनाचे उद्‌घाटन त्यांनी केले.

कर्नाटकात मराठी माणसाच्या मृत्यूनंतर स्मशानात अंत्यंस्कारासाठीचा अर्जदेखील कन्नडमध्ये भरावा लागतो; अन्यथा अंत्यसंस्कार होऊ शकत नाहीत. मराठीवरचा हा कानडी अत्याचार असमर्थनीय आहे.

- श्रीपाल सबनीस

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, प्रा. चंद्रकुमार नलगे, विजय चोरमारे, वि. द. कदम, डॉ बाबुराव गुरव, प्रा. अविनाश सप्रे, अनुराधा गुरव, मकरंद देशपांडे, संजय मेंढे, विजय धुळूबुळू आदी उपस्थित होते. गणेश माळी यांनी स्वागत केले.

लेखिका प्रतिभा जगदाळे ( चंदनवृक्ष ), अरुण इंगवले ( अतुट धैर्यातील सूर्य ), आप्पासाहेब पाटील ( तडजोड ), डॉ. व्ही. एन. शिंदे ( एककांचे मानकरी ) यांना सबनीस यांच्या हस्ते चैतन्य शब्दांगण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

डॉ. सबनीस म्हणाले, साहित्य संमेलनापुरते जागे होणारे साहित्यिक आणि राजकारणी इतर वेळी झोपलेले असतात. वीस-पंचवीस लाख मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रातील लोकांनी चळवळ उभी केली पाहीजे; सरकारवर दबाव आणला पाहीजे. सीमाभाग राष्ट्रपती राजवटीखाली आणला पाहीजे. 

डॉ. सबनीस हणाले, ग्रामीण भागात साहित्य संमेलनाची संख्या वाढली आहे. ती साहित्याची व संस्कृतीची बेटे ठरताहेत. मुंबई-पुण्याकडील साहित्याची केंद्रे विद्वेषाची केंद्र बनली आहेत. विद्वेषाने ती जळताहेत. भविष्यात संमेलनाच्या पालखीत मुस्लिमांसह सर्व जाती-धर्माच्या लेखकांची पुस्तके ठेवायला हवीत. देशातल्या वीस-तीस कोटी मुस्लिमांपैकी 95 टक्के मुस्लिम येथेच जन्मले आहेत. खरा हिंदू धर्म द्वेष शिकवत नाही. सर्व जातीधर्मातील लेखकांनी विवेकाची शेती केली पाहीजे. 

हल्लीच्या पिढीतील स्त्रिया लिहित्या झाल्या आहेत. माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे सांगणाऱ्या अनेक मुली दररोज भेटतात. काळ बदलला तसा स्त्रीनेही अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. 

- तारा भवाळकर

दुपारच्या सत्रात डॉ बाबुराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली "अभिव्यक्ती व साहित्यिकांची जबाबदारी" या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. राजेंद्र कुंभार, अविनाश सप्रे सहभागी झाले. त्यानंतर कवीसंमेलन रंगले. संध्याकाळी रिर्सोर्सेस आयोजित मोक्ष नाटीका सादर झाली. संयोजन प्रा. भीमराव धुळूबुळू, नामदेव भोसले, बाबासाहेब आळतेकर, आर. एम. चव्हाण. केशव नकाते, धनंजय भिसे, विजयकुमार माने, ऋजुता माने, निर्मला लेंढे, बाळासाहेब बरगाले, जयवंतं मोतुगडे, विनायक हलवाई आदींनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com