भांबर्डे येथे पत्नीस मारहाण करून पतीची आत्महत्या

दिलीप कोळी
सोमवार, 30 जुलै 2018

विटा - भांबर्डे (ता.खानापूर ) येथे पतीने पत्नीच्या डोक्यात, हातावर, माथ्यावर व कानावर कु-हाडीने वार करून गंभीर जखमी केले. तर पतीन  स्वत: दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुजाता विजय बाबर (वय 40) असे जखमी पत्नीचे तर विजय बाबर (वय 45) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नांव आहे.

ही घटना रविवारी (ता.29) रात्री अकराच्या सुमारास घडली. जखमी सुजातावर कृष्णा चॅरिटेबल कराड येथे उपचार सुर आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. असे सहायक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी सांगितले. 

Web Title: Sangli News suicide incidence in Bhabarde