उत्पादन शुल्कच्या विभागीय आयुक्त दरेकर यांना धमकी 

उत्पादन शुल्कच्या विभागीय आयुक्त दरेकर यांना धमकी 

सांगली - उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय आयुक्त संगीता दरेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र पोलिस मुख्यालयास मिळाले आहे. त्याच्या चौकशीचे आदेश कोल्हापूर विभागाचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिलेत. यापूर्वीही श्रीमती दरेकर यांना निनावी दूरध्वनीवरून जीवितास धोका असल्याचे सूचित केले होते. 

याबाबतची माहिती अशी, की उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय आयुक्त संगीता दरेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी जत येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई केली होती. त्यामुळे तेथील विक्रेत्यांच्या मनात राग आहे. जत तालुक्‍यात परवाने घेऊन दारू विक्रीस कोणी धजावत नाही. कुणी प्रयत्न केला तर तो अवैध दारू विक्रेते हाणून पाडतात. अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे आहे. हे जाळे मोडून काढण्याचे काम दरेकर यांनी केले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दरेकर यांना एकाने दूरध्वनीवरून "तुमच्या जीवितास धोका आहे. काळजी घ्या' असे सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे काम सुरूच होते. मात्र आता एक निनावी पत्रच आले आहे. यात त्यांच्या जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे. या पत्राची दखल घेत श्री. नांगरे-पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेत. 

काम करताना अशा धमक्‍या येतच असतात. त्यामुळे कामावर परिणाम होत नाही. धमकीमुळे उलट माझे काम जोमाने करणार आहे. जतमधून एक दूरध्वनी "तुमच्या जीवितास धोका आहे, काळजी घ्या' असे सांगणारा आला होता. 
- संगीता दरेकर, 

विभागीय आयुक्त, उत्पादन शुल्क, कोल्हापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com