सांगलीकरांनो... पर्यटनाचा आनंद लुटायला सज्ज व्हा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली - मनःशांती व कुटुंबीयांना स्पेस म्हणून सर्वच घटकांना पर्यटनासाठी बाहेर जावे वाटते. दिवाळीची सुटी असो किंवा नाताळ. फिरायला जायचं प्लॅनिंग असेल. पण, नेमकं जायचं कुठे... तिथली माहिती आपल्याला मिळेल का... खर्च किती... असे नाना प्रश्‍न डोक्‍यात असतील तर चिंता सोडा. "सकाळ माध्यम समूहा'तर्फे एक सप्टेंबरपासून सांगलीत "हॅप्पी जर्नी'- टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स प्रदर्शन आहे. राममंदिर चौकातील कच्छी भवनात तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात पर्यटनाच्या संधींची कवाडं खुली करून देण्यात येणार आहेत. 

गेल्या वर्षी सांगलीकरांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर यंदाही हे खास प्रदर्शन आयोजित केले आहे. स्थानिक पर्यटन संस्थांसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहलींचे आयोजन करणाऱ्या नामवंत पर्यटन संस्थांचा सहभाग आहे. सहलीसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, पासपोर्ट-व्हिसापर्यंत, घरातून पिक-अप करण्यापासून ते इच्छित पर्यटनस्थळांची सफर घडवून आणून पुन्हा घरी पोचविण्यापर्यंतची सेवा आता मिळू लागलीय. "थीम टूर आणि पॅकेज टूर' अशा विविध कन्सेप्ट येथे रुजल्या आहेत. त्याला मिळणारा प्रतिसादही उत्स्फूर्त आहे. सांगलीकरांना सर्व पर्यटन संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी हे प्रदर्शन पर्वणी असेल. 

स्टॉल बुकिंगला प्रतिसाद 
प्रदर्शनात नामवंत पर्यटन संस्था सहभागी होत आहेत. स्थानिक संस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी आजच स्टॉल बुक करा. बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही मोजकेच स्टॉल शिल्लक आहेत. 
* स्टॉल बुकिंगसाठी संपर्क ः परितोष भस्मे (9766213003)