दरोड्याच्या तयारीतील टोळीमधील दोघांना अटक

दरोड्याच्या तयारीतील टोळीमधील दोघांना अटक

सांगली - दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना सांगली शहर पोलिसांनी मंगळवारी (ता.२०) रात्री ताब्यात घेतले. अन्य तिघेजण पळून गेले. संजय शहाजी भोसले (वय २१) आणि हृषीकेश बाबासाहेब भोसले (वय १८, दोघेही रा. उंबरवडा, रांजणी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना ता. २४ पर्यंत कोठडी सुनावली आहे. सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस तानाजी पवार हे काल (ता. २०) गस्तीवर होते.

त्यांना आकाशवाणीजवळ पहाटे संजय भोसले आणि हृषीकेश भोसले यांच्यासह पाचजण संशयितरीत्या वावरताना दिसले. अधिक चौकशी केली असता ते पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी दोघेजण ताब्यात आले. तर इतर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता टांग फाट्याकडे जायचे आहे अशी शंकास्पद उत्तरे दिली.

इतर तिघांच्या विषयी त्यांच्याकडे चौकशी केली असता  आम्ही त्यांना ओळखत नाही अशी उत्तरे दिली. त्यामुळे संजय भोसले आणि हृषीकेश भोसले यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चायना बनावटीचा चाकू आढळून आला. त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली.  दुपारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना २४ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. इतर तिघांचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com