'भारती'मध्ये दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सांगली -  भारती हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकत्याच यशस्वीपणे करण्यात आल्या. किडनीदाते आणि किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. भारती हॉस्पिटलमधील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे, अशी माहिती भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी दिली.

ते म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील एक व कोल्हापूर जिल्ह्यातील एक अशा दोन पुरुष रुग्णांपैकी एकाला त्याच्या बहिणीने आणि दुसऱ्याला त्याच्या आईने किडनी दान केली. नाडियाद (गुजरात) येथील मूलजीभाई पटेल किडनी हॉस्पिटलचे डॉ. अरविंद गणपुले आणि डॉ. रवींद्र सबनीस या विशेषज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटलमधील डॉ. संजय पुरोहित, डॉ. चंद्रहास कुरणे या पथकाने ही शस्त्रक्रिया पार पाडली.