डॉ. वसुधा जोशी यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

सांगली - वाशी (नवी मुंबई) येथे होणाऱ्या नवजात बालकांविषयीच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत लिटल चॅंप्स या लहान मुलांच्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वसुधा सुहास जोशी यांनी भाग घेतला आहे.

सांगली - वाशी (नवी मुंबई) येथे होणाऱ्या नवजात बालकांविषयीच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत लिटल चॅंप्स या लहान मुलांच्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वसुधा सुहास जोशी यांनी भाग घेतला आहे.

एमजीएम इिन्स्टट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने नॅशनल निओनॅटोलॉजी फोरम आणि पेडियॅिट्रक असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने परिषद होत आहे. ‘नवजात बालकांच्या काळजीची बदलणारी आव्हाने’ विषयावरील परिषदेत जगातील नामवंत बालरोग तज्ज्ञ सहभागी होत आहेत. नवजात बालकाची काळजी आणि सुविधा, इको कार्डिओग्राफी, कांगारु मदर केअर, ॲहव्हान्स्ड व्हेंटीलेशन, ह्युमन मिल्क बॅंकिंग अशा महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. १७ सप्टेंबरपर्यंत परिषद सुरु राहणार आहे.