विधानसभेचा कचरा झालाय - पतंगराव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

सांगली - पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंतचा मुख्यमंत्रिपदाचा काळ डोळ्यांसमोर आला, की आता विधानसभेचा कचरा झाल्यासारखे वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराच्या बळावर ही नवीन पोरं आली; पण त्यांनी आपली प्रतिमा जपावी, अशी टोलेबाजी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पतंगराव कदम यांनी केली.

ज्येष्ठ नेते, माजी आमदार संभाजी पवार यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. पतंगराव कदम यांनी संभाजी पवार यांच्या विधानसभेतील भाषणांचे दाखले देत "संभाजीची मंत्रिमंडळाला धास्ती वाटायची', अशा शब्दांत गौरव केला. त्यानंतर त्यांनी जुन्या व आजच्या काळाची तुलना केली.