व्हिसा फसवणूक प्रकरणी पोलिसपुत्र एजंट पवारला अटक

व्हिसा फसवणूक प्रकरणी पोलिसपुत्र एजंट पवारला अटक

सांगली - मलेशियात हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी कुपवाडमधील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार याला शहर पोलिसांनी आज रात्री अटक केली. त्याचा सहकारी धीरज पाटील यालाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. ‘सकाळ’ने फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आणून आरोपीला अटक होईपर्यंत पाठपुरावा केला.

याबाबत अधिक माहिती अशी, मलेशियात हॉटेल मॅनेजर म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. नगर), दीपक लिंबाजी माने (रा. हुन्नर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि सदानंद धनगर (रा. जवळगाव) यांची कौस्तुभ पवारने फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून त्याने दीड ते अडीच लाखांपर्यंत रक्कम उकळली होती. 

मात्र, त्यांना ट्रॅव्हल व्हिसा दिला. वर्क व्हिसा दिला नाही. ट्रॅव्हल व्हिसा संपल्यानंतरही त्यांना वर्क व्हिसा न मिळाल्याने मलेशियाच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. या चौघांना मलेशियाच्या न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, गुरुनाथ कुंभारचे मेहुणे नामदेव कुंभार यांनी शहर पोलिसांत कौस्तुभ पवार आणि त्याचा सहकारी धीरज पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता; परंतु गेले आठ दिवस कौस्तुभ पवार पोलिसांना सापडत नव्हता. त्याचे वडील पोलिस अधिकारी असल्यानेच पोलिस त्याला शोधण्यात दिरंगाई करत आहेत, असा आरोप तरुणांच्या नातेवाइकांनी केला होता. 

कौस्तुभचा मोबाईल स्वीच ऑफ आहे, त्याचा संपर्क होत नाही, आदी कारणे सांगून पोलिस त्याला अटक करत नव्हते, असाही आरोप होत होता.

मलेशियात तरुणांना शिक्षा झाल्याचे वृत्त समजल्यानंतर गुरुनाथ कुंभारचे नातेवाईक काल (मंगळवारी) शहर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून दोन दिवसांत कौस्तुभ पवारला अटक केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तपास अधिकारी उपनिरीक्षक चव्हाण यांना सूचना दिल्या आणि सायंकाळी कौस्तुभ पवारला त्याच्या भारत सूत गिरणीजवळच्या घरातून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com