आठवलेंनी सरकारमध्ये राहणे योग्य नाही - विवेक कांबळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

सांगली - सरकारमध्ये राहणे योग्य नाही, अशी आंबेडकरी जनतेची भावना आहे. त्यामुळे याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचार करावाच लागेल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विवेक कांबळे यांनी आज येथे दिला.

सांगली - सरकारमध्ये राहणे योग्य नाही, अशी आंबेडकरी जनतेची भावना आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना याचा विचार करावाच लागेल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विवेक कांबळे यांनी आज येथे दिला.

काल मुंबईत पक्षाची बैठक झाली. त्यानंतर ते आज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ”सरकारचे सध्या काही बरे नाही. आज भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हेगार मोकाट आहेत. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना अटक झाली पाहिजे. तर मुख्यमंत्री हा सरकारविरोधी कट आहे, असे म्हणतात. त्यांचे विधान निषेधार्ह आहे. सरकार आंबेडकरी जनतेची दिशाभूल करीत आहे.

श्री. कांबळे पुढे म्हणाले, बाबासाहेबांचे स्मारक होत नाही. पेशवाई असल्याप्रमाणे मुख्यमंत्री वागत आहेत. त्याचे ताज़े उदाहरण म्हणजे कमी पटाच्या तुकड्या बंद करण्याचा निर्णय. यामुळे बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे हे कारस्थान आहे. मुख्यमंत्री केवळ कोरेगांवभीमा प्रकरणाची न्यायाधीशामार्फत चौकशीची घोषणा करतात. करीत काहीच नाहीत.” अशीही टीका त्यांनी केली. 

Web Title: Sangli News Vivek Kamble comment