लग्नाच्या मांडवातून थेट श्रमदानास..

विजय पाटील
रविवार, 22 एप्रिल 2018

सांगली -  जिल्ह्यातील वांगी गावचे सुपुत्र विशाल मधुकर सुतार यांचा लिंब गावातील माया हिच्याशी आज साडेबाराच्या मुहूर्तावर विवाह झाला. विशाल हा मुंबई येथे वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत आहेत. लग्नानंतर त्यांनी लगेचच श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामात श्रमदान केले.

लग्नाला आलेल्या पाहुणे, मित्र मंडळी, ग्रामस्थांनी साडेबाराच्या शुभ मुहूर्तावर दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकत आशीर्वाद दिले. फोटो काढणे, जेवणखाण, भेटाभेटी व निरोप देणे झाले. त्यानंतर विशाल बायकोला म्हणाला `चला टिकाव खोरे घ्या.. पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला माळावर जायचंय !` त्याच्या या वाक्याने इतरांप्रमाणे नववधूही बावरली. मात्र समाजाला वाहतूक शिस्तीचे धडे देणाऱ्या या तरुणाने लोकांना पाण्याचे धडे देत श्रमदान करण्याचे महत्व पटवून दिले. सर्व तयार झाले आणि अंगाला हळद लागलेला जोडा व त्यांच्यासोबत अन्य वराती रानात निघाली. जोडा भर उन्हात शेतात माती खणू लागला. नवरा पाट्या भरून देतोय व बायको पाट्या टाकत होती. अगदी वेगळे चित्र होते. त्यांच्या या कृतीने भारावलेल्या नातेवाईक व मित्रमंडळी यांनीही टिकाव, खोरे व पाट्या हातात घेतल्या तासभर घाम गाळला. दोघांनी काम किती केले यापेक्षा त्यांच्यातील जीवंत असलेल्या सामाजिक कृतीला उपस्थित सर्वांनीच सलाम केला.

श्रमदानात लिंबची आघाडी....

लिंब हे दुष्काळी गाव. पाण्याच्या झळा सोसणारे तासगाव तालुक्यातील हे गाव. अभिनेता आमीर खानच्या  सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन वॉटरकप २०१८ च्या स्पर्धेमध्ये या गावानेही सहभाग घेतला आहे. यंदा 49 गावांनी त्यात सहभाग घेत कामाचा धडाका लावला. मात्र सर्व गावात लिंबने आघाडी घेतली आहे. बायका, मुले, वृद्ध, तरुण, अपंग इतकच काय सर्जा राजानंही श्रमदानाला येथे सुरवात केली आहे.

Web Title: Sangli News water scarcity work