कोसारी- शेगाव रस्त्यावर नदीत तोल जाऊन महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

जत - कोसारी हून शेगावकडे जाणाऱ्या पुलावरून वाहून जाऊन आक्काताई मच्छिंद्र पाटील (वय ५५)  या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

जत - कोसारी हून शेगावकडे जाणाऱ्या पुलावरून वाहून जाऊन आक्काताई मच्छिंद्र पाटील (वय ५५)  या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मंगळवारी रात्री वाळेखिंडी, कोसारी या भागात जोराचा पाऊस झाल्याने कोसारी- शेगाव रस्त्यावर असलेल्या पुलावरून जोरात पाणी वाहत होते. सतत हा पूल पाण्याखाली असल्याने त्या पुलावरील रस्ता खराब झाला आहे. 

बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आक्काताई पाटील या गुरे आणण्यासाठी गेल्या होत्या.  गुरे परत आणत असताना पुलावरून जोराचे पाणी वाहत होते. आक्काताई या पुलावरून येत असताना त्यांचा पुलावर असलेल्या खड्डयात तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या. काही कळायच्या आत त्या पात्रात वाहत जात गटांगळ्या खाऊ लागल्या.  ही घटना पाहणाऱ्यानी त्यांना तत्काळ तेथून बाहेर काढले, पण पाणी जोरात असल्याने तसेच त्यांचा श्‍वास  कोंडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स