विटा : कलेढोणमधील महिलेचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

सविता यांना गेल्या आठ दिवसापासून ताप येत  होता. त्यानंतर त्यांच्यावर कलेढोण, मायणी व विटा येथे खासगी रुग्णालयात उपचार सूरु होते.

कलेढोण :  येथील सविता प्रशांत आतकरी (वय 30) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला.

सविता यांना गेल्या आठ दिवसापासून ताप येत  होता. त्यानंतर त्यांच्यावर कलेढोण, मायणी व विटा येथे खासगी रुग्णालयात उपचार सूरु होते. त्यानंतर त्यांना सांगलीतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान सविता यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविता यांचा मृत्यू स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :