हिंदकेसरींमध्ये चुरशीची कुस्ती : जस्साने गुज्जरला केले चीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

हिंदकेसरी जस्सा आणि गुज्जर यांची लढत प्रेक्षणीय झाली. गुज्जरने पहिल्यांदा आक्रमकपणे डावावर पकड घेतली. पण डाव उधळून लावत जस्साने हुकूमत कायम ठेवली. 36 मिनिटे डाव चुरशीत झाला. अखेर घुटना डावावर जस्साने गुज्जरला अस्मान दाखविले. महापौर चषक कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरत मैदानावर जल्लोष झाला.

सांगली : येथील तरुण भारत स्टेडियमच्या चारही बाजू कुस्ती शौकिनांनी खचाखच भरल्या होत्या... एकापेक्षा एक कुस्त्या झाल्या. टाळ्या अन्‌ शिट्टयांनी दाद मिळत होती. रात्री साडेनऊला पंजाबचा हिंदकेसरी जस्सा पट्टी आणि दिल्लीचा हिंदकेसरी वरुणकुमार गुज्जर यांची धमाकेदार एंट्री झाली. तब्बल 36 मिनिटे त्यांनी काट्याची टक्कर दिली. अखेर तगड्या जस्सीने घुटना डावावर गुज्जरला चितपट करत 'महापौर चषक कुस्ती' मैदान गाजवले. मैदान अविस्मरणीय ठरले.

घुटना डावावर जस्साने गुज्जरला दाखविले अस्मान.. या लढतीची छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वज्रदेही हरिनाना पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका आणि विजयंता मंडळातर्फे रविवारी कुस्ती मैदान झाले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, हिंदकेसरी दीनानाथसिंह, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, 'सर्वोदय' कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार, शेखर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मैदान शौकिनांनी खचाखच भरले होते. दुपारपासून तब्बल 58 कुस्त्या झाल्या.
हिंदकेसरी जस्सा आणि गुज्जर यांची लढत प्रेक्षणीय झाली. गुज्जरने पहिल्यांदा आक्रमकपणे डावावर पकड घेतली. पण डाव उधळून लावत जस्साने हुकूमत कायम ठेवली. 36 मिनिटे डाव चुरशीत झाला. अखेर घुटना डावावर जस्साने गुज्जरला अस्मान दाखविले. महापौर चषक कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरत मैदानावर जल्लोष झाला.

कोल्हापूरचा संतोष दोरवड आणि सांगलीचा सुधाकर गुंड यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली. बराचवेळ चालेलेल्या कुस्तीत अखेर दोघांनाही पाच मिनिटांचा वेळ पंचांनी दिला. त्यानंतर पहिल्याच मिनिटात दोरवडने पाय घिस्सा डावावर गुंड याला चितपट केले. कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि कोल्हापूरचा विजय धुमाळ यांच्यातील लढत प्रेक्षणीय झाली. दोन्ही चपळ मल्लांनी काट्याची टक्कर दिली. अखेरीस काटेने पट काढला. त्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
संभाजी सुडके विरुद्ध संतोष लवटे, नाथा पालवे विरुद्ध संग्राम पाटील, वसंत केचे विरुद्ध अशोकी कुमार, रामदास पवार, विरुद्ध सचिन केचे, तुषार पाटील विरुद्ध कपिल सनगर, भानुदास पाटील विरुद्ध किरण भद्रावती या लढती प्रेक्षणीय झाल्या. शंकर पुजारी, ज्योतिराम वाजे यांनी समालोचन केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

उद्योगजकतेच्या दिशेने तरूणाईने टाकले एक पाऊल पुढे
मुंबई सांताक्रूझ परिसरात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या
उद्या लागणार बारावीचा निकाल
गाण्यांत वापरली इंग्रजी, हिंदी भाषा तर बिघडले काय? : महेश मांजरेकर
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
नोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
... आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री